विराट अजून15 शतके ठोकणार, सिद्धूची भविष्यवाणी

काल पाकिस्तानविरुद्ध आपले 51 वे एकदिवसीय शतक साजरे करणारा विराट कोहली अजून दोन-तीन वर्षे क्रिकेट खेळणार आणि त्याचबरोबर 10 ते 15 शतके ठोकणार, अशी भविष्यवाणी खुद्द नवज्योत सिंह सिद्धूने केली आहे. गेल्या काही महिन्यात विराट कोहलीच्या बॅटीतून धावांचा झरा आटल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असताना या शतकाने त्याचे मनोधैर्य पुन्हा एकदा उंचावले आहे.

चार वर्षांपूर्वी वन डे आणि कसोटीत धावांसह शतकांचा वर्षाव करणार्या कोहलीच्या बॅटमधून दसरा-दिवाळीप्रमाणे मोठया खेळ्या केल्या जात आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजी इतकी खालावलीय की त्याला लवकरच आपली निवृत्ती जाहीर करावी लागेल की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्यातच त्याने आयसीसी स्पर्धात आपल्या शतकांचा सिलसिला कायम राखताना पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी साकारत सहावे शतक ठोकले. त्याच्या या कामगिरीनंतर अवघ्या विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

सिद्धू एका शोमध्ये म्हणाला, चरित्र कधीही संकटात निर्माण होत नाही. तो प्रदर्शित होतो. विराट अशी व्यक्ति आहे, ज्याच्याकडे याची मालिका आहे. त्यामुळे या शतकानंतर तो येत्या 2-3 वर्षात किमान 10ते 15 शतके आणखी ठोकेल. त्याने गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली अपयशाची मालिका नेमकी पाकिस्तानविरुद्धच संपवली. जेव्हा त्याने पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाऊस पाडला, तेव्हाच त्याचे टायमिंग कळले. पाकिस्तानविरुद्ध केलेली खेळी 10 वर्षे कुणीच विसरत नाही. युवकांसाठी ही एक प्रेरणा आहे. विराट एक आदर्श आहे. तो एका पीढीत एकदाच जन्माला येणार खेळाडू आहे. तो कोहिनूर आहे.

Comments are closed.