Gang clash at Civil Hospital; Stones thrown, vandalism in accident ward
जुन्या भांडणातून हाणामारीमध्ये जखमी झालेल्या दोन युवकांना जिल्हा रुग्णालयाच्या अपघात कक्षात आणले असता दोन गट समोरासमोर आले. यावेळी टोळक्याने आरडाओरड करत विटांसह दगडफेक केल्याने अपघात कक्षात तणावमय परिस्थिती निर्माण झाली होती. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात या विभागातील वैद्यकीय साहित्य कुठेही पडले होते तर जीव वाचवण्यासाठी डॉक्टर व रुग्णांनी पळापळ केली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेत सुरक्षारक्षक, कर्मचारी, परिचारिके एक महिला रुग्ण जखमी झाली. ही घटना रविवारी (दि.२३) रात्री सात वाजेदरम्यान अपघात कक्षात घडली. (Gang clash at Civil Hospital; Stones thrown, vandalism in accident ward)
भद्रकालीतील दोन जखमी युवक रविवारी सायंकाळी सात अपघात कक्षात उपचारासाठी आले. यावेळी त्यांची तपासणी सुरू असताना दुसर्या गटाचा जमाव आला. या गटाने त्या दोघांना मारहाण करत राडा घातला. यामुळे अपघात कक्षात तणाव निर्माण झाला. डॉक्टर, परिचारिकांनीही आडोशाला लपून स्वत:चा बचाव केला. मोठे दगड व स्टूल, खुर्च्या उचलून फेकल्याने भीतीचे वातावरण पसरले. या गोंधळाने रूग्णांचे नातेवाईक व रूग्ण भयभीत झाले होते. सुरक्षारक्षक व जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीच्या कर्मचार्यांनी अपघात कक्षात धाव घेतली तोपर्यंत टोळके पळून गेले. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Comments are closed.