इतिहास घडला.! रचिन रविंद्रच्या 'या' विश्वविक्रमाने क्रिकेटविश्वात खळबळ, सचिन-कोहलीही फेल!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्रने इतिहास रचला आहे. तो विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात रवींद्रने 112 धावा केल्या, जे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सहावे शतक आहे. यापूर्वी, त्याने 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकात पदार्पण केले. ज्यात पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या डावात खेळणाऱ्या बांग्लादेशने न्यूझीलंडसमोर 237 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडने विल यंग आणि केन विल्यमसन यांचे बळी लवकर गमावले. तर डेव्हॉन कॉनवे देखील 30 धावा करून बाद झाला. यानंतर किवी संघ सामन्यात बॅकफूटवर होता. मात्र यानंतर आलेल्या डावखुऱ्या रचिन रवींद्रने जबाबदारी घेतली. त्याने 105 चेंडूत 112 धावा केल्या. ज्यात त्याने त्याच्या डावात 12 चौकार आणि एक षटकार मारला. रवींद्रने टॉम लॅथमसोबत 129 धावांची भागीदारीही केली.

रचिन रवींद्रचे नाव खूपच वेगळे आहे. परंतु कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की त्यांचे वडील भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचे खूप मोठे चाहते आहेत. त्याने राहुल आणि सचिनची नावे एकत्र करून आपल्या मुलाचे नाव रचिन ठेवले. आता तेंडुलकर आणि द्रविडच्या मार्गावर चालत, रचिन देखील विक्रम करत आहे.

रचिनने 5 ऑक्टोबर 2023 रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय विश्वचषकात पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने नाबाद 123 धावा करत न्यूझीलंडला 9 विकेटने विजय मिळवून दिला. आता त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील पदार्पण स्वतःसाठी संस्मरणीय बनवले आहे. शिवाय रचिनने आयसीसी वनडे स्पर्धेत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतके केल्या आहेत. रवींद्रने आतापर्यंत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 26 डावांमध्ये चार शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

आयसीसी वनडे स्पर्धेत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतके

रचिन रवींद्र – 4 (11 डाव)
केन विल्यमसन – 3 (34 डाव)
नॅथन अ‍ॅस्टल – 3 (35  डाव)

हेही वाचा-

Champions Trophy: भारत-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये! यजमान पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
तेंडुलकरचे वनडेमधील 5 विश्वविक्रम, जे विराट कोहली कधीही नाही मोडू शकणार!
दुबईतील पराभवानंतर चाहत्याची भावना – “ICC, भारत-पाकिस्तानला वेगळ्या गटात टाका!”

Comments are closed.