BAN vs NZ: बांगलादेशला हरवून न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, भारतही पात्र; यजमान पाकिस्तान बाहेर

न्यूझीलंडने बांग्लादेशचा 5 विकेट्सने पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. यासह, किवी संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. न्यूझीलंडच्या विजयाचा भारतालाही फायदा झाला आहे कारण हे दोन्ही संघ थेट अंतिम-4 मध्ये पोहोचले आहेत. या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत 236 धावा केल्या, प्रत्युत्तरात किवी संघाने 23 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले.

रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांग्लादेश प्रथम फलंदाजी करायला आला. सामन्यात जणू काही कर्णधार नझमुल शांतो आज आपल्या संघाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरला होता. तन्जीद हसन, मेहदी हसनपासून ते गेल्या सामन्यातील शतकवीर तौहीद हृदयॉयपर्यंत, सर्वजण सतत बाद होत राहिले, परंतु कर्णधार शांतो एका मजबूत भिंतीसारखा उभा राहिला. किवी संघाला त्रास देत राहिला. त्याने 110 चेंडूत 77 धावांची प्रेशर इनिंग खेळली. सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या झाकीर अली रिशाद हुसेनने अनुक्रमे 45 आणि 26 धावा केल्या. जर हे डाव आले नसते तर बांग्लादेश 200 पेक्षा कमी धावांमध्येच बाद झाला असता.

237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली, कारण विल यंग आणि केन विल्यमसन 15 धावांवर असताना पॅव्हेलियनमध्ये परतले. पण तिथून, रचिन रवींद्रने जबाबदारी स्वीकारली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात शतकासह 112 धावा केल्या. त्याच्याशिवाय टॉम लाथननेही 55 धावांची महत्त्वाची खेळी खेळली आणि किवी संघाला विजयाच्या जवळ नेले.

जर बांग्लादेशने न्यूझीलंडवर विजय मिळवला तरच बांग्लादेश आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत टिकला असता. आता बांग्लादेश आणि पाकिस्तानने त्यांचे दोन्ही सामने गमावले आहेत. तर भारत आणि न्यूझीलंडचे गट अ मध्ये प्रत्येकी चार गुण आहेत. अशा परिस्थितीत बांग्लादेश आणि पाकिस्तान संघांना उपांत्य फेरीत पोहोचणे शक्य नाही. आता या दोन्ही संघाच्या या चॅम्पियन्स ट्राॅफीतील प्रवासाला लाल दिवा लागला आहे. असं म्हणलं तर वावगं ठरणार आहे.

हेही वाचा-

इतिहास घडला.! रचिन रविंद्रच्या ‘या’ विश्वविक्रमाने क्रिकेटविश्वात खळबळ, सचिन-कोहलीही फेल!
Champions Trophy: भारत-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये! यजमान पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
तेंडुलकरचे वनडेमधील 5 विश्वविक्रम, जे विराट कोहली कधीही नाही मोडू शकणार!

Comments are closed.