WPL 2025: दिल्लीचा गुजरातवर शानदार विजय, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप
दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2025) शानदार कामगिरी केली. संघाने 29 चेंडू शिल्लक असताना गुजरात जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयात संघाची उत्कृष्ट गोलंदाजी आणि जेस जोनासेनची ६१ धावांची स्फोटक खेळी महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या गुजरात जायंट्सवर दबाव आला. सुरुवातीच्या अपयशामुळे गुजरात संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांना 20 षटकात 9 बाद फक्त 127 धावा करता आल्या. पॉवर प्लेमध्ये, संघाने 20 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. परिणामी गुजरात संघाला मोठे लक्ष्य निश्चित करता आले नाही.
भारती फुलमाळीने नाबाद 40 धावा करत संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. भारती फुलमाळीने 29 चेंडूंच्या खेळीत दोन षटकार आणि चार चौकार मारले. डिआंड्रा डॉटिनने 26 धावा केल्या, परंतु इतर फलंदाजांना लक्षणीय योगदान देता आले नाही. अशाप्रकारे गुजरात जायंट्स दिल्लीला फक्त 128 धावांचे लक्ष्य देऊ शकले. दिल्लीकडून मॅरिझाने कॅप, शिखा पांडे आणि अॅनाबेल सदरलँड यांनी शानदार गोलंदाजी केली. त्यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने फक्त 15.1 षटकांत विजय मिळवला. जेस जोनासेनने फक्त 32 चेंडूत 61 धावा केल्या, ज्यात नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. तिच्याशिवाय, शेफाली वर्माने 27 चेंडूत 44 धावांची जलद खेळी खेळली. तिने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने 6 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरातने 4 सामन्यांत फक्त एक विजय मिळवला आहे. ते तळाशी आहेत.
हेही वाचा-
वयाच्या 52 व्या वर्षी सचिनने पुन्हा मैदान गाजवले, फलंदाजी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘देव तो देवच’
चॅम्पियन्स ट्रॉफीत ट्विस्ट; अफगाणिस्तानला विजय, इंग्लंडला ‘करो या मरो’
Comments are closed.