पाकिस्तान विरुद्ध नाबाद शतक ठोकलं, विराट कोहलीला आयसीसीकडून गुड न्यूज
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठीचं रँकिंग जारी केलं आहे. विराट कोहलीला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मॅचमधील वनडेतील शतकाचा फायदा झाला आहे. विराट कोहलीनं वनडेमधील 51 वं शतक पाक विरुद्ध केलं. या शतकाचा विराटला फायदा झाला. विराट कोहलीच्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. आता वनडेच्या रँकिंगमध्ये टॉप पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. शुभमन गिल पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे.
विराट कोहली पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी सहाव्या स्थानावर होता. तो आता पाचव्या स्थानावर आला आहे. विराटनं पाक विरुद्ध 111 बॉलमध्ये नाबाद 100 धावा केल्या आहेत. कोहलीनं त्या डावात 7 चौकार आणि एक षटकार मारला होता. विराट कोहलीनं रोहित शर्मा 20 धावा करुन बाद झाल्यानं संघाची धुरा सांभाळली. भारतानं ती मॅच 6 विकेटनं जिंकली.
एकदिवसीय सामन्यांच्या वनडे रँकिंगमध्ये शुभमन गिल 817 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. तर बाबर आझम 770 रेटिंगसह दुसऱ्या स्थनावर आहे. तिसऱ्या स्थानी भारताचा कॅप्टन रोहित शर्मा 757 अंकांसह आहे. चौथ्या स्थानावर हेनरिक क्लासेन चौथ्या स्थानावर आहे. तर, विराट कोहली आता 743 अंकासह पाचव्या स्थानावर आहे.
गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीला फायदा
मोहम्मद शमी 2023 च्यावनडे वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट पासून दुखापतीमुळं दूर होता. इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मोहम्मद शमीनं पुनरागमन केलं होतं. मोहम्मद शमीनं आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन सामन्यात शमीनं 5 विकेट घेतल्या. याचा त्याला फायदा झाला असून शमी 15 व्या स्थानावरुन 14 स्थानावर आला आहे. गोलंदाजीत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव तिसऱ्या स्थानी तर श्रीलंकेचा खेळाडू महेश थीक्षणा पहिल्या स्थानावर आहे.
भारत आणि न्यूझीलंड 2 मार्चला
भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्ताननं भारताला 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. भारतानं त्याचा बदला पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत करुन घेतला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता येत्या 2 मार्चला सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दुसरीकडे ब गटातून कोणते संघ उपांत्य फेरीत पोहोचणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पावसानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत रद्द झाल्यानं चुरस वाढली आहे.
इतर बातम्या :
कॅच सोडल्याची भरपाई म्हणून डिनर देणार, रोहित शर्मानं शब्द दिला पण पूर्ण केला का? अक्षर पटेल म्हणाला…
अधिक पाहा..
Comments are closed.