आयपीएल 2025 पूर्वी करूण नायरचा मोठा धमाका! देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये ‘करुण नायर’ची (Karun Nair) विस्फोटक कामगिरी सुरूच आहे. त्याने प्रथम ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्ये (Vijay Hazare Trophy) चमकदार कामगिरी केली आणि त्यानंतर ‘रणजी ट्रॉफी’मध्येही (Ranji Trophy) त्याने चमकदार कामगिरी केली. यासह, करुण नायरने आता रणजी ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8,000 धावा पूर्ण केल्या आहेत. विदर्भ आणि केरळ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात करुण नायरने हा पराक्रम केला. नायरने त्याच्या 114व्या प्रथम श्रेणी सामन्यात हा रेकाॅर्ड केला. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि त्यासोबतच त्याने मोठा रेकाॅर्डही आपल्या नावावर केला.
नागपूरमध्ये विदर्भ आणि केरळ यांच्यात 2024-25च्या रणजी ट्रॉफीचा फायनल सामना खेळला जात आहे. दरम्यान, केरळच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो आतापर्यंत योग्य ठरत असल्याचे दिसत नाही. परंतु, प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का शून्य धावसंख्येने सहन करावा लागला. सलामीवीर पार्थ रेखाडे खाते न उघडताच बाद झाला. ध्रुव शोरेने 16 धावा केल्या आणि दर्शन नालकांडेला फक्त 1 धाव करता आली.
एकेकाळी विदर्भाने फक्त 24 धावांत 3 विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर, करुण नायर आणि दानिश मालेवार यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 215 धावांची शानदार भागीदारी केली. यादरम्यान, दानिशने 259 चेंडूत 14 चौकारांसह 2 षटकारांच्या मदतीने 138 धावांची शानदार खेळी केली. तो अजूनही नाबाद आहे. तर करुण नायरने 188 चेंडूत 8 चौकारांसह षटकाराच्या मदतीने 86 धावा केल्या. तो दुर्दैवाने धावबाद झाला. दरम्यान तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
फजितीनंतर PCB चा मोठा निर्णय! आता घेतली नवी रणनीती
भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधील इतिहास काय सांगतो? कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड!
“पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीची धमाकेदार खेळी, ICC क्रमवारीत झेप घेतली!”
Comments are closed.