लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनी संस्कृती, परंपरेचा आविष्कार

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मुंबईसह राज्यभरात संस्कृती, परंपरेचा आविष्कार घडला. अनेक शाळांमध्ये आयोजित दिंडी सोहळय़ांमध्ये विद्यार्थ्यांनी मराठीचा गौरव केला, तर मराठी भाषा साहित्याचा ऊहापोहदेखील विविध कार्यक्रमांमध्ये करण्यात आला. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य एक तो मराठी!’ अशीच भावना मराठीप्रेमींनी व्यक्त केली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवारी माहीम येथील सरस्वती मंदिर शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषा स्वागत यात्रेने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष संजय नटे यांच्या सूचनेनुसार मराठी भाषा दिनानिमित्त घाटकोपर पूर्वेकडील काही शाळा, कॉलेजला भेट देत त्यांच्या प्राचार्यांना विविध मराठी साहित्यिकांची पुस्तके भेट देण्यात आली. रामजी आशरच्या प्राचार्या स्मिता लाड, विद्या निकेतन कॉलेजचे प्राचार्य राम तिवारी, महापालिका शाळेच्या प्राचार्या दीपा गोसावी आदी मान्यवरांना डोंबिवली संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, प्रशांत निर्भवने, चंद्रकांत हळदणकर यांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली.

जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन बालविकास मंदिर, मेघवाडी नाका येथे साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिमाखदार ऐतिहासिक पोवाडा तसेच नाटक सादर केले. आमदार अनंत (बाळा) नर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्रमिक विद्यालयाचे संचालक आणि शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष अजित चव्हाण, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, महिला संघटक शालिनी सावंत, समन्वयक रवींद्र साळवी, उपविभागप्रमुख बाळा साटम, कैलाशनाथ पाठक, उपविभाग समन्वयक कालिदास कांदळगावकर, महेश गवाणकर आदी उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवसेना मालाड पश्चिम आणि शिवस्नेही प्रज्ञा प्रबोधन संस्थेच्या वतीने नामवंत मराठी लेखकांनी लिहिलेल्या  पुस्तकांचे प्रदर्शन प्रबोधन विद्या निकेतन शाळेत भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मालाड विधानसभा प्रमुख अशोक पटेल यांच्या झाले. यावेळी विधानसभा संघटक मीना कारंडे, संपर्कप्रमुख आशीष आजगावकर, मिलिंद मांडाळकर, समन्वयक नेत्रा मालाडकर, किरण केणी, विजय मांडाळकर, प्रभाकर देसाई, किशोर वेसावकर, मुख्याध्यापक प्रविणा वाडेकर, रोहिणी सावे, नीलम माने, मनीषा घेवडे उपस्थित होते.

डॉ आंबेडकर महाविद्यालयात मराठीचा जागर

मराठी भाषा गौरव दिवस आज वडाळ्याच्या डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. एसएनडीटी महाविद्यालयातील मराठी भाषेच्या प्राध्यापिका डॉ नेहा जाधव-राजवर्धन यांनी मराठी भाषेची महती सांगितली. तसेच मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गवई, प्रा. श्रीकांत ओझा, बी.जी.जाधव, लक्ष्मण बेडेकर, संजय गमरे, विलास चिखले,वाघुले  उपस्थित होते.

Comments are closed.