Vijay Wadettiwar asked whether government is serious about incidents of women’s abuse


मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गाडे या नराधमाने तरुणीला शिवनेरी बसमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. ही घटना बुधवारी (ता. 26 फेब्रुवारी) उघडकीस आली. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी तर वारंवार घडणाऱ्या या घटनांबाबत सरकार गंभीर आहे की नाही? असा प्रश्नच उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, असे म्हणत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहे. (Vijay Wadettiwar asked whether government is serious about incidents of women’s abuse)

आज गुरुवारी (ता. 27 फेब्रुवारी) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्वारगेट बस स्थानकात झालेली घटनेची जबाबदारी सरकार आणि एसटीने स्वीकारली पाहिजे. घटना घडली तेव्हा तिथे असलेली यंत्रणा काय करत होती. रिकाम्या बसमध्ये जे काही मिळाले आहे, ते धक्कादायक आहे. त्या ठिकाणी चार रिकाम्या बस महिलांच्या शोषणसाठी वापरल्या जात होत्या का? असा प्रश्न निर्माण होतो. गृह विभागाची इभ्रत रोज चालली आहे, ती वेशीवर टाकल्यासारखी स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा… Pratap Sarnaik : स्वारगेटमधील आरोपीची पोलिसांना ओळख कशी पटली? बसचा दरवाजा उघडा होता? सरनाईकांनी दिली A टू Z माहिती

तसेच, सरकार सत्तेत दंग आहे. सरकारला महिलांची चिंता नाही. पुण्यातील या घटनेचा मुद्दा आम्ही विधानसभा अधिवेशनात मांडू. गृह विभागाचा आणि कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. पुणे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी असली, तरी मुलींच्या बाबतीत अत्यंत धोक्याचे शहर झाले आहे. महाराष्ट्र शक्ती कायद्याची कठोर अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा. अशा घटना वारंवार घडत आहेत. सरकार या घटनांवर गंभीर आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित होतो. फक्त म्हणत आहेत की, आम्ही कारवाई करू. आम्ही अटक करू. परंतु ते काही करत नाहीत. महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली आहे, या शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.



Source link

Comments are closed.