पोलीस शोधण्यासाठी आल्याचं समजताच दत्तात्रय गाडेने ठोकली धूम; घराच्या छतावरून उडी मारली अन्…या

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या शिरूर तालुक्यतील त्याच्या मुळगावी गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता अशी माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता, तर नराधम गाडेला पकडून देण्यासाठी स्थानिक नागरिकांची पोलिसांनी मदत घेतली.

 ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही. दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहिरटी यांच्या घरी साडे दहा वाजता आला. त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला. ⁠त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड ही त्या ठिकाणी आणले.⁠पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला. ⁠त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही. ⁠तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून राहीला. ⁠याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं.⁠दत्ता गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली.

नातेवाईकांना गाडे म्हणाला, मला पश्चात्ताप होतोय !

रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आल्यानंतर, मला पश्चाताप होत आहे. मला सरेंडर व्हायचं आहे, असे तो बोलला. गेल्या दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात अन्न पाण्याशिवाय लपून बसून होता. आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक पहाटे पुण्यात दाखल झाले आहे.

पोलिसांच्या देखत त्याने ठोकली धूम

स्वारगेटमध्ये त्याने 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने घरी गेला. त्यानंतर त्याने बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात सकाळी हजेरी लावली, तर दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले. त्यावेळी पोलिस आल्याचे पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पळून गेला. त्याचा मोबाइल बंद झाल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या.

गाडेचा ड्रोनद्वारे शोध, 250 पोलिसांचा फौजफाटा

आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना करण्यात आली होती. त्याच्या गुनाट (ता. शिरूर) या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला होता. गावाच्या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने तो शेतात लपून बसल्याची शक्यता होती. काल गुरूवारी दुपारपासून ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबवला.
मात्र, गावात ये-जा करण्यासाठी 3 असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू असून, सुमारे 250 पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्र-मैत्रिर्णीसह आई-वडिलांकडेही चौकशी केली.

Comments are closed.