मंगळवारी पहाटे गुन्हा, बुधवारी उघडकीस, गुरुवारी दिवसभर तपास, शुक्रवारी अटक या दिवसांमध्ये काय क
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला दत्तात्रय गाडे याच्या मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्या दृष्टीने तपास सुरू झाला. त्याची सर्व माहिती पोलिसांनी काढली. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराइताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तात्रय रामदास गाडे (वय 35, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गाडे याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांत यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. आरोपी नराधम दत्तात्रय गाडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. गाडे पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी 13 पथके तयार केली. गाडेच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची, मैत्रिणींची पोलिसांनी बुधवारी रात्री चौकशी केली.
गाडेचा ड्रोनद्वारे शोध, 250 पोलिसांचा फौजफाटा
नराधम दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना झाली होती. त्याच्या गुनाट (ता. शिरूर) या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला होता. गावाच्या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने तो त्या ठिकाणी लपून बसल्याची शक्यता होती. काल गुरूवारी दुपारपासून ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबवला. मात्र, गावात ये-जा करण्यासाठी 3 असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू असून, सुमारे 250 पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्र-मैत्रिर्णीसह आई-वडिलांकडेही चौकशी केली.
Stal घटन
* बस स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे 26 वर्षीय तरुणी आल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने तिला तिच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये बसण्यास सांगून नंतर तिच्यावर बलात्कार केला.
* सकाळी साडेसहाच्या सुमारास घटना घडल्यानंतर आरोपी एसटीने शिक्रापूर येथील घरी गेला. गुन्ह्याची भीती आणि पोलिसांकडून पकडले जाण्याच्या संशयातून त्याने घरातून पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
* बुधवारी संपूर्ण घटना उघडकीस आली, तेव्हापासून पोलिसांनी त्याची ओळख पटवून शोध सुरू केला, गुरुवारी दिवसभर तपास करण्यात आला, त्याच्या घरातील व्यक्तींची, मित्रमंडळींची चौकशी करण्यात आली.
* घरातून पळून गेल्यानंतर गावातव त्याने एका वृद्ध महिलेला पाणी मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले. तो शिक्रापूर परिसरात शेतात लपून बसल्याचा संशय आहे.
* या घृणास्पद प्रकारानंतर त्याने आयुष्याचे काही बरे-वाईट करण्याचा विचारही केला असल्याची शक्यता वर्तवली गेल्याने पोलिसांनी शिक्रापूर परिसरातील सर्व विहिरी धुंडाळून काढल्या.
* पोलीस ड्रोनच्या साह्याने, डॉग स्कॉडच्या मदतीने सर्वत्र त्याचा शोध घेतला. शुक्रवारी अखेर स्थानिकांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली आहे.
Comments are closed.