Sanjay Raut big statement about accused in serious crimes saying that laws are different everywhere in Maharashtra


पुण्यातील स्वारगेट बस डेपो लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला घटनेच्या 70 तासांनंतर अटक करण्यात आली आहे. पण ही घटना घडल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधण्यात आला.

मुंबई : पुण्यातील स्वारगेट बस डेपो लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला घटनेच्या 70 तासांनंतर अटक करण्यात आली आहे. पण ही घटना घडल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधण्यात आला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात घडणाऱ्या विविध गुन्हांच्या घटनांवरून आणि घटनांमधील आरोपींबाबत मोठे विधान केले आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाले कारण ते ठाणे होते, पण हे पुणे आहे. या ठिकाणी झालेली गुंडांची ओळख परेड हा मोठा स्टंट होता, असे राऊतांनी म्हटले आहे. (Sanjay Raut big statement about accused in serious crimes saying that laws are different everywhere in Maharashtra)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 28 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, तेव्हा पेढे वाटण्यात आले. पण आता पुणे प्रकरणातील आरोपीबाबत काय होणार असे वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. पण आता निवडणुका नाही आणि तो ठाणे जिल्हा होता आणि हा पुणे जिल्हा आहे. जिल्ह्याजिल्ह्यात कायदा बदलत असतो, असा टोला राऊतांनी लगावला. तर मधल्या काळात पुण्यामध्ये गुंडांची परेड करण्यात आली होती, याबाबत राऊत म्हणाले की, जरी ओळख परेड केली असेल तरी त्या सर्व गुंडांनी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादीसाठी काम केले होते. त्या काळामध्ये त्या गुंडांना मोकळीक मिळाली होती, असा मोठा आरोप राऊतांनी केला होता.

हेही वाचा… Dattatray Gade Arrested : मोठी बातमी, अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक

तसेच, हे सर्व गुंड ज्यांचे मी नावे घेत नाही. ज्यांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी केली होती, तो एक मोठा इव्हेंट त्यांनी केला होता. परंतु, ते सर्वच गुंड विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सक्रीय होते. पण प्रचारावेळी आयुक्तांनी त्यांची धिंड आणि ओळख परेड का काढली नाही? असा सवाल यावेळी राऊतांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता राऊतांनी केलेल्या या आरोपांवरून खळबळ उडाली असून त्यांच्या या विधानावर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय उत्तर देण्यात येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Comments are closed.