चित्रपट पाहण्यासाठी लोक चक्क ड्रम आणि बादल्या घेऊन पोहोचले सिनेमागृहात!

सिनेमागृहात चित्रपट पाहताना खाण्याची एक वेगळीच मज्जा असते. तसेच अनेकजण या दरम्यान पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंगचा आस्वाद घेतात. मात्र, सिनेमागृहातील मिळणाऱ्या पदार्थांच्या किमती खिशाला परवडणाऱ्या नसतात. यामुळे अनेक लोक खाण्याचे पदार्थ गुपचूप सिनेमागृहात नेतात. मात्र सौदी अरेबीयामध्ये या उलट घडत आहे. येथे लोक चक्क चित्रपट पहायला बादल्या आणि मोठे ड्रम घेऊन येताना दिसत आहेत. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सौदी अरेबीयामध्ये एका चित्रपटगृहाने चित्रपटासोबत 696 रुपयांना अमर्यादित पॉपकॉर्नने भरलेला कंटेनर मोफत देण्याची घोषणा केली होती. या मोफत ऑफरचा फायदा घेण्यासाठी सौदी अरेबीयातील लोकांनी मोठे ड्रम आणि बादल्या आणत सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी आले आहेत. डायलॉग पाकिस्तान नावाच्या हँडलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये लोक जास्तीत जास्त पॉपकॉर्न मिळवण्यासाठी मोठमोठी भांडी घेऊन दिसत आहेत. पाहा व्हिडिओ…
Comments are closed.