Fashion Tips : उन्हाळ्यासाठी परफेक्ट बॉलीवूड स्टाइल कुर्तीज्

उन्हाळ्यात सैल आणि हलके कपडे घालणे शरीरासाठी चांगले असते. मात्र, जर तुम्हाला या साध्या शैलीच्या कपड्यांमध्ये फॅशनचा ट्विस्ट जोडायचा असेल, तर तुम्ही उन्हाळ्यात काही बॉलीवूड स्टाइल कुर्तीज् देखील ट्राय करू शकता. उन्हाळ्यात, फक्त कॉटनचेच नाहीत तर ऑर्गेन्झा आणि चिकनकारी कुर्ती देखील एक उत्तम लूक देतात. तुम्ही ते सुंदर फिल्मी स्टाइलच्या पटियाला सलवार, लेगिंग्ज किंवा पलाझोसोबत घालू शकता. उन्हाळ्यात परिधान करता येऊ शकतील अशा बॉलीवूड स्टाइल कुर्ती डिझाइन्सविषयी जाणून घेऊयात आजच्या या लेखातून.

उन्हाळी सूट कलेक्शनसाठी नवीन कुर्ती डिझाइन्स:

उन्हाळ्यात, चिकनकारी आणि लखनवी पॅटर्नच्या कुर्ती घालणे चांगले असते. तुम्ही अशा कुर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या सलवारांसह स्टाईल करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसात हलक्या रंगाचे कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही पेस्टल शेड आणि पांढऱ्या रंगाच्या कुर्ती निवडू शकता. तुम्ही त्यांना रंगीबेरंगी आणि हेवी वर्क असलेल्या दुपट्ट्यांसह देखील सजवू शकता.

उन्हाळ्यात, पांढऱ्या रंगाचे कपडे सर्वात हलके आणि कम्फर्टेबल असतात. अशा परिस्थितीत, या उन्हाळ्याच्या हंगामाला अधिक फॅशनेबल बनवण्यासाठी, तुम्ही या व्हाइट फ्लोरल किंवा व्हाइट चिकनकारी डिझाइन ट्राय करू शकता. स्ट्रेट आणि अनारकली या प्रकारच्या कुर्तीही खूप सुंदर लूक देतात.

उन्हाळ्यात सुती कपडे आपले सौंदर्य खुलवतात. अशा परिस्थितीत लहान कुर्ती आणि कुर्ती-पँट सेट दोन्ही ट्राय करता येऊ शकतील. क्लासी लूकसाठी तुम्ही अशा नवीन डिझाइनच्या कुर्ती या पॅन्ट, शरारा किंवा पलाझोसोबत देखील कॅरी करू शकता. ऑफिसमधील मुलींसाठी या प्रकारचे सूट हा उत्तम पर्याय आहे.

आजकाल ऑर्गेन्झा कुर्ती खूप फॅशनमध्ये आहेत. आलियापासून कियारा दीपिकापर्यंत, सर्व बॉलीवूड नायिका इतक्या साध्या, सुंदर आणि ग्रेसफुल दिसणाऱ्या कुर्ती घालतात. उन्हाळ्याच्या हंगामात तुम्ही अशा प्रकारची कुर्ती डिझाइन देखील वापरून पाहू शकता.

चंदेरी आणि फुलकारी वर्क असलेल्या कुर्तीदेखील चांगला लूक देतात.असे सूट केवळ ऑफिसमध्येच नाही तर पार्टीमध्येही परिधान करून तुम्ही देसी आणि पारंपरिक लूक मिळवू शकता. उन्हाळ्यासाठी तुम्ही असे सूट तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच ठेवावेत.

हेही वाचा : Makeup Hacks : ग्लॅमरस दिसण्यासाठी झटपट मेकअप हॅक्स


संपादित – तनवी गुडे

Comments are closed.