स्वारगेट बस प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्ह
दत्ताट्रे गॅडेवरील अजित पवार यांना अटक केली: पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने शिरूर तालुक्यतील गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेतले आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, एखादी घटना घडल्यावर ती कशा पद्धतीने लोकांपुढे मांडायची हा मीडियाचा अधिकार आहे. त्या घटनेचा सगळ्यांनी निषेध केला. आरोपीला अटक करण्यासाठी आणि सर्वजण प्रयत्न करत होतो. रात्री त्याला अटक झाली. तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आज त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. काय वस्तुस्थिती आहे ते निष्पन्न होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
हे मला विचारू नका
बलात्काराच्या प्रकरणावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, अमुक असं बोलला, तमुक असं बोलला हे मला विचारू नका. स्वारगेट प्रकरणात मी सकाळीच पोलीस आयुक्तांना बोललो. आरोपीची चौकशी चालू आहे, असे त्यांनी म्हटले.
प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली. याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार केल्याचा आरोप केला. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेता, ते रोज सकाळी दहा वाजता काही तरी बोलतात. प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. गुंडांच्या बाबतीत ते जे काही बोलले, त्याबाबतीत तक्रार असेल, जर गुंड असतील तर त्या गुंडांच्या नावानिशी तक्रार द्या. पोलीस चौकशी करतील, असे प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊत यांनी दिले.
https://www.youtube.com/watch?v=vzxllofkbjy
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.