Alibaug Fire – अलिबागजवळ भर समुद्रात मच्छीमार बोटीला आग, 18 खलाशी सुखरूप

अलिबागजवळ भर समुद्रात एका मच्छिमार बोटीला भीषण आग लागली. या बोटीवर 18 खलाशी होते. सुदैवाने सर्व खलाशी सुखरूप आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आक्षी साखर येथील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे.
भर समुद्रात बोटीने पेट घेतला. आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली. बोटीच्या वरील जाळी देखील जळाली आहे. बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणून आग विझविण्याचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
Comments are closed.