Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray on the issue of Hindutva


(Shelar Vs Thackeray) मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंभमेळ्यातील गंगास्नानावर टीका केली. गर्व से कहो हम हिंदू है, त्यासोबतच अभिमानाने म्हणा मी मराठी आहे, असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ‘ढोंगी हिंदुत्ववादी’ म्हणत, उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. (Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray on the issue of Hindutva)

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंभमेळ्यातील गंगास्नानाबरोबरच भाजपाच्या ‘जय श्रीराम’चाही समाचार घेतला. कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का आणि त्यांचे पाप धुतले जाणार नाही, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि आणि त्यांच्या इतर सहयोगी संघटनांकडून जय श्रीरामचा आग्रह केला जातो. आपण एकमेकांना नमस्कार करताना रामराम म्हणतो. आता त्याचे श्रीराम कधीपासून झाले आणि आपण ते म्हणायला लागलो, याचाही विचार करण्याची गरज आहे.

आता भाजपा नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी (उद्धव ठाकरे) सोडले तर कोट्यवधी श्रद्धाळू दर्शन करून आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ सिनेमा आला. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर, जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला. ‘छावा’वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा ‘सामना’ सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत, स्वागत करीत आहेत. कुंभमेळा भरला. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करून आले, असा टोला त्यांनी लगावला आहे.

याशिवाय, त्यांनी कवितेच्या चार ओळीतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सभेत दाखवण्यापुरती हातात रुद्राक्षांची माळ घाली
औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी…
ओळखलेत का?
महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी?

हेही वाचा – Thackeray On Mahayuti Govt : लाडक्या बहिणी विनासंरक्षण, गुंडांना संरक्षण, राज्यातील बेबंदशाहीवर ठाकरे भडकले





Source link

Comments are closed.