पाकिस्तानची पुन्हा होणार नाचक्की…. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एक,दोन नाही तर 3 वेळा टीम इंडियाशी भ

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानी संघ आमनेसामने आले होते. या रोमांचक सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. सीमा आणि सुरक्षा वादांमुळे हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये या वर्षी आणखी 3 सामने खेळले जाऊ शकतात.

यजमानपद भारताकडे…

क्रिकबझच्या वृत्तानुसार,  च्या आशिया कपचे यजमानपद भारताला देण्यात आले असले तरी, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत श्रीलंका आणि यूएई या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण, बीसीसीआय अधिकृत यजमान राहील.

2025 चा आशिया कप होणार टी-20 स्वरूपात

शेवटचा आशिया कप 2023 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कपपूर्वी खेळला गेला होता, त्यामुळे त्याचे स्वरूप एकदिवसीय ठेवण्यात आले होते. यावेळी, 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी होणाऱ्या आशिया कप 2025 चे स्वरूप टी-20 असेल. क्रिकबझच्या वृत्तानुसार, या स्पर्धेत हे सर्व सामने आशिया कपमध्ये होणार आहेत. 2025 च्या आशिया कपचे यजमानपद भारताला देण्यात आले असले तरी, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय तणावामुळे, तो तटस्थ देशात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकूण 8 संघ होणार सहभागी

2025 च्या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी होतील. ज्यात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान, हाँगकाँग, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश असेल. या आठ संघांची दोन गटात विभागणी केली जाईल. दोन्ही गटांमधील अव्वल 2 संघ सुपर-4 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सुपर-4 मधील दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील.

… तर आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ 3 वेळा भिडणार?

गट सामन्याव्यतिरिक्त, भारत आणि पाकिस्तानी संघ सुपर-4 फेरीत एकमेकांशी भिडू शकतात. याशिवाय, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना शक्य आहे. जर असे झाले तर स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात. पण, अद्याप अधिकृतपणे ही माहिती उघड झालेली नाही. आशिया कपचे वेळापत्रक, यजमान, स्वरूप आणि संघ याबद्दलची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होऊ शकते. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, श्रीलंकेव्यतिरिक्त, आशिया कप 2025 चे यजमानपद (यूएई) ला देखील दिले जाऊ शकते.

हे ही वाचा –

Champions Trophy 2025 Qualification Scenario : जर पावसामुळे सामना रद्द झाला तर सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध कोण भिडणार?; ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका की अफगाणिस्तान? जाणून घ्या गणित

अधिक पाहा..

Comments are closed.