Pune Bus Rape Case – वक्तव्य संवेदनशीलपणे करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा गृह राज्यमंत्री योगेश कदमांना सल्ला

पुण्यातील स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे कान टोचले आहेत. वक्तव्य संवेदनशीलपणे करावं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक संवेदनशीलपणे बोलावं, असा मी त्यांना सल्ला देईन. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते योगेश कदम?
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने कोणताही प्रतिकार केला नाही. जे घडले ते अत्यंत शांततेत घडले. त्यामुळे आम्ही काय करायचे? पीडित महिलेने आरोपीशी हाणामारी केली नाही. त्यामुळे बसमध्ये बलात्कार चाललाय हे बाहेरच्या लोकांना समजले नाही. सर्व शांतपणे चालत होते. घटना सकाळी सहा वाजता घडली व तक्रार नऊ वाजता केली, तोपर्यंत आरोपी पळून गेला, असे वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्य गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते.
Comments are closed.