Sanjay Raut was angered by Yogesh Kadam statement regarding Swargate rape case victim
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 28 फेब्रुवारी) प्रसारम माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.
मुंबई : स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्ये मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीच्या तब्बल 70 तासांनंतर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. परंतु, या प्रकरणी वाद निर्माण झाला आहे तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानावरून. कारण घटनेच्यावेळी पीडित तरुणी ओरडली नाही. तिने कोणताही प्रतिकार केला नाही, असे मंत्री कदम यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करून आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत, असे म्हणत टीका केली आहे. (Sanjay Raut was angered by Yogesh Kadam statement regarding Swargate rape case victim)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 28 फेब्रुवारी) प्रसारम माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानाचा समाचार घेत म्हटले की, पोलिसांनी किंवा सरकारने आरोपीला पकडून उपकार केले आहेत का? सार्वजनिक ठिकाणी, जिथे सार्वजनिक परिवहन खात्याचे सर्वात मोठे स्थानक आहे, तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात. अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत विकृती वाढत जाईल. आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत. ते म्हणतात की बसमध्ये हाणामारी झाली, शांतपणे बलात्कार झाला, त्यामुळे बाहेर कळले नाही, ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे. एका महिलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग, बलात्कार होतो आणि तिने स्ट्रगल केले नाही, हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केले नाही, त्यामुळे आम्हाला बाहेर कळले नाही. तिचा गळा दाबला, तोंड दाबले, तिच्यावर जबरदस्ती केली.आणि हे काय बोलतात, असे म्हणत राऊतांनी योगेश कदम यांचा समाचार घेतला.
तर, पुण्यामध्ये या गोष्टी घडत आहेत, इथले पालकमंत्री अजित पवार आहे, त्यांना सगळे दादा म्हणतात. मग पुण्यातच या गोष्टी का घडत आहेत? असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केाल. तर, कायद्याचा धाक उरलेला नाही, पोलिसांची भीती राहिलेली नाही. पोलीस असो की कायदा, आम्ही कसेही मॅनेज करू असा विश्वास करू शकतो असा विश्वास गुंडांमध्ये आहे. न्यायालयात हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे. राजकीय वरदहस्त लाभलेले हे गुन्हेगार मोकाट फिरतात. गुन्हेगार हे कोणाचे नसतात कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात, असेही यावेळी राऊतांनी म्हटले.
Comments are closed.