मराठी भाषा गौरव दिन इंग्लिश स्कूलमध्ये साजरा

मराठी भाषा गौरव दिन गायत्री अॅण्ड संत सावता इंग्लिश स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
देशातील अनेक प्रमुख भाषांपैकी एक मराठी भाषा आहे. तसेच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. मराठी भाषेची माहिती आणि महत्त्व शिक्षकांनी मुलांना पटवून सांगितले पाचवी व सहावीच्या मुलींनी ही माय भूमी, ही जन्म भूमी या गाण्यावर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी भाषण केले. यावेळी शाळेच्या सचिव जाधव प्रियंका, मुख्याध्यापिका एस.एस. जगताप, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments are closed.