शुभमन गिलला मिळणार मोठी जबाबदारी? रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

भारत आणि न्यूझीलंड संघात 2 मार्च रोजी रविवारी दुबईमध्ये सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी संघात मोठा बदल करण्याची शक्यता आहे. एका रिपोर्ट नुसार रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या अनुपस्थितीत शुबमन गिलला संघाचे नेतृत्व देण्यात येऊ शकते. शुबमन गिल भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.

रोहित सातत्याने खेळत आहे . त्याला पाकिस्तान सामन्यादरम्यान त्रास होत होता. रोहितच्या मांसपेशींमध्ये ताण आला होता. तो सामन्यादरम्यान मैदानातून बाहेर सुद्धा गेला होता. जर रोहित पूर्णपणे ठीक नसेल तर त्याला न्यूझीलंड सामन्यात आराम दिला जाऊ शकतो. इंडियन एक्सप्रेस च्या माहितीनुसार रोहितच्या गैरहजेरीत शुबमन गिलला भारतीय संघाचे नेतृत्व करावे लागेल. तसेच याविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली तर, त्याच्या जागी रिषभ पंतला संघात संधी मिळू शकते. पण ऋषभ पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून शुबमन सोबत के एल राहुल खेळू शकतो. राहुल बऱ्याच वेळा सलामीवीर म्हणून खेळलेला आहे.

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत चांगली शानदार सुरुवात केली. त्यांनी त्यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळून विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले.भारतीय संघाने दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरीत त्यांचे स्थान पक्के केले आहे. आता भारतीय संघ त्यांच्या अ गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी रविवारी न्यूझीलंड विरुद्ध दुबईच्या मैदानावर खेळणार आहे.

हेही वाचा

चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावर रिटायरमेंट घेऊ शकणारे 5 क्रिकेटर्स

सचिनचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर विराट, नवा इतिहास रचण्याची संधी!

IPL: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! हंगाम सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त?

Comments are closed.