Maharashtra cm devendra fadnavis office receives attack threat from pakistani number in marathi


Maharashtra CMO News : मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धमकी मिळाली आहे. आणि ती देखील थेट पाकिस्तानी नंबरवरून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा व्हॉट्सऍप मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला आहे. मुंबईतील वरळी पोलिसांनी हा मेसेज मिळाल्यावर लगेचच गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल पोलिसांना आला होता. हा मेल गोरेगाव, जे.जे. पोलीस स्टेशन, सीएमओ आणि मंत्रालय येथे पाठवण्यात आला होता. या प्रकरणातील संशयिताला गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. तर त्यानेच कथितरित्या मेल पाठवल्याचे तपासात समोर आल्याचे मुंबई गुन्हे शाखेने सांगितले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील धमकी आल्याने सर्व यंत्रणा ऍलर्ट मोडवर गेल्या आहेत. (maharashtra cm devendra fadnavis office receives attack threat from pakistani number)

मुंबई ट्रॅफिक पोलिसांना हा धमकीचा मेसेज व्हॉट्सऍपद्वारे मिळाला आणि तोही पाकिस्तानी नंबरवरून. बुधवारी दुपारी हा मेसेज मिळाल्यानंतर पोलीस एकदम सतर्क झाले आहेत. हा मेसेज पाठवणाऱ्याचे नाव मलिक शाहबाज हुमायूं राजा देव असे सांगितले जात आहे. हा मेसेज पाठवणारा व्यक्ती भारतात आहे की भारताच्या बाहेर आहे, याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा – Manav Sharma Suicide : …अन्यथा पुरुष असेच आत्महत्या करतील, आग्र्यात पुन्हा अतुल सुभाष सारखी घटना

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाला पाकिस्तानी नंबरवरून आलेल्या या मेसेजची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाच्या एकत्रित चौकशीस सुरुवात केली आहे.

गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हा धमकीचा मेल गोरेगाव आणि जे.जे. मार्ग पोलीस स्टेशनसह अनेक सरकारी कार्यालयांना पाठवण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या या धमकीच्या मेल प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351(3), 351(4), आयटी ऍक्ट आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

तीन वर्षांपूर्वी मिळाली होती धमकी

26/11 चा दहशतवादी हल्ला कोणताही मुंबईकर कधीच विसरू शकत नाही. अशाच प्रकारचा हल्ला 20 ऑगस्ट 2022 रोजी करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला होता. तेव्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती.

हेही वाचा – Thackeray On Mahayuti Govt : लाडक्या बहिणी विनासंरक्षण, गुंडांना संरक्षण, राज्यातील बेबंदशाहीवर ठाकरे भडकले



Source link

Comments are closed.