Major Fire In Mumbai Kolhapur Alibaug Today News In Marathi


मुंबई, कोल्हापूर आणि अलिबागकरांसाठी शुक्रवारचा दिवस अग्नितांडवाचा दिवस ठरला आहे. शुक्रवारी सकाळी पहिला मुंबईत आग लागली. त्यानंतर कोल्हापूर आणि अलिबागमध्ये भीषण आग लागली आहे. तिन्ही ठिकाणी लागलेल्या आगी भीषण आहेत.

मुंबई : मुंबई, कोल्हापूर आणि अलिबागकरांसाठी शुक्रवारचा दिवस अग्नितांडवाचा दिवस ठरला आहे. शुक्रवारी सकाळी पहिला मुंबईत आग लागली. त्यानंतर कोल्हापूर आणि अलिबागमध्ये भीषण आग लागली आहे. तिन्ही ठिकाणी लागलेल्या आगी भीषण आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. (Major Fire In Mumbai Kolhapur Alibaug Today News In Marathi)

मुंबईतील आग

दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील न्यू ग्रेड इंस्टा मीलजवळ असलेल्या सॅलसेट इमारतीला भीषण आग लागली आहे. शुक्रवारी सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास ही आग लागली. सॅलसेट इमारतीच्या वरच्या भागात आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सॅलसेट इमारत ही रहिवाशी इमारत असल्याचं समजतं. आग लागली त्यावेळी इमारतीत कोणी अडकलं आहे का, याचा तपास अग्निशमन दलाच्या जवानांकडून केलं जात आहे. तसेच, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचाही तपास अग्निशमन दलाकडून केला जात आहे.

कोल्हापुरातील आग

कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये भीषण आग लागली आहे. कोल्हापूर शहरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. टर्बाईन पेटल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. ऊस गळीत हंगाम सुरु असतानाच आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आग विझवण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व अग्नीशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं आहे. आगीचे धूर लांबून सुद्धा दिसून येत आहेत.

अलिबागमधील आग

अलिबाग समुद्रातील मासेमारीच्या बोटीला आग लागली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली. आग लागलेल्या बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बोटीला लागलेली आग भीषण असून धुराचे मोठे लोंढ पाहायला मिळत आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बोटीत असलेल्या खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. ही बोट 80 टक्के जणून खाक झाली आहे. स्थानिकांनी आगीतील खलाशांना सुखरूप बाहेर काढल्याचं समजतं.


हेही वाचा – Namdeo Dhasal : Nonsense लोकांना नेमले म्हणूनच…, रोहित पवारांचा सेन्सॉर बोर्डासह सरकारवर निशाणा



Source link

Comments are closed.