Santosh Deshmukh Case – व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर कारवाई करा, धनंजय देशमुख यांची मागणी

बीड कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी वागणूक देत असल्याचा आरोप संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत आता तुरुंग प्रशासनाकडे देशमुख कुटुंब तक्रार करणार आहे. तसेच देशमुख कुटुंब माहिती अधिकारात कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी देखील करणार आहे.

याच दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले आहेत की, याआधीच वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार यादीच केली होती. यानंतर ते आता लेखी तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्यास संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावरी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याबाबत जेल प्रशासनानं पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, असंही ते म्हणाले आहेत.

Comments are closed.