दुबईतील रंगतदार सामना: भारतीय आणि न्यूझीलंड संघांसाठी खेळपट्टी कशी असेल?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा ग्रुप-अ पूर्ण पणे तयार झालेला आहे. या ग्रुपचा शेवटचा सामना रविवार (2 मार्च) रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना दुबईमध्ये होणार आहे, जिथे आतापर्यंत कोणत्याही संघाचा स्कोअर 250 धावांपेक्षा जास्त गेला नाही. एकीकडे लाहोरमध्ये धावांचा पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे दुबईमध्ये फलंदाजांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील विजयी संघ ग्रुप-अ मध्ये प्रथम स्थान मिळवेल. भारत-न्यूझीलंड सामन्यात खेळपट्टी कशी असेल, फलंदाज आनंदी असतील का, गोलंदाज कहर करतील हे जाणून घेऊया.

दुबईतील खेळपट्टी खूपच संथ मानली जाते. येथे फिरकी गोलंदाजांना सहसा मदत मिळते, तरी गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांनी येथे 11 विकेट घेतल्या आहेत. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये, पाठलाग करणाऱ्या संघाने चार वेळा विजय मिळवला आहे. या मैदानावरील एकूण विक्रम पाहिला तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 22 वेळा आणि पाठलाग करणाऱ्या संघाने 36 वेळा विजय मिळवला आहे. मागील सामन्यांमध्ये, वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूमुळे थोडा स्विंग मिळाला. अशा परिस्थितीत, मोहम्मद शमी देखील जोरदार खेळी करताना दिसू शकतो.

भारताकडून दुबई मधील स्टेडियमवरती सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. कर्णधार रोहितने आतापर्यंत या मैदानावर 7 सामन्यात 75.60 च्या शानदार सरासरीने 378 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत या मैदानावर 2 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 122 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने दुबईमध्ये कधीही एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. हे आकडे टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी मानसिक बळ देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या :

नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर शमी, कुंबळेचा विक्रम मोडणार?

“दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठी भर! हंगाम सुरू होण्यापूर्वी दिग्गजाची एंट्री”

सचिनचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर विराट, नवा इतिहास रचण्याची संधी!

Comments are closed.