Korean Tea : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोरियन चहा उत्तम

भारतीय आणि चहा जणू एक समीकरण आहे. चहा प्यायल्याशिवाय कित्येकजणांची सकाळ होत नाही. कोणी दुधाचा चहा पितं तर कोणाला कोरा चहा प्यायला आवडतो. आरोग्याच्याबाबतीत अधिक जागरूक असणारे कोरा चहा प्यायला प्राधान्य देतात. इतकचं काय तर हल्ली बरेचजण दुधाचा चहा न पिता केवळ हर्बल चहा पिण्याला प्राधान्य देतात. कारण हर्बल चहा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. बदलत्या हवामानानुसार वायरल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. या वायरल इन्फेक्शनपासून शरीराचा होण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोरीयन चहा पिणे फायद्याचे ठरते. चला जाणून घेऊयात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उत्तम असणारे कोरियन चहा

ओमिझा टी –

ओमिडा टी ओमजा बॅरीपासून तयार केला जातो. याशिवाय यात अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असणारे मध देखील टाकले जाते. ओमिजा म्हणजे पाच फ्लेवर्सचा चहा असतो. हा चहा यकृतासाठी बेस्ट मानला जातो. यासह सर्दी-खोकला झालेल्या रूग्णांसाठी ओमिजा टी वरदान समजला जातो. कारण यातील पोषकतत्वांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

कॉर्न टी –

कॉर्न टी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हा चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि पचनसंस्था सुरळीतपणे कार्य करते. याशिवाय बदलत्या हवामानात रोगप्रतिकारकशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कॉर्न टी प्यायला हवी. या चहामध्ये आयर्न आणि ऍटी-ऑक्सिडंट आढळतात, जे शरीरातील जळजळ कमी करतात.

सिट्रॉन चहा –

हा चहा युझू फळाच्या प्रिझर्व्ह केलेल्या कापांपासून तयार केला जातो. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी चहा बेस्ट ठरतो.

ग्रीन प्लम टी –

उन्हाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ग्रीन प्लम टी चा आस्वाद घ्यायला हवा. हा चहा प्यायल्याने आतडे निरोगी राहते.

जॉब टायर्स टी –

जॉब्स टियर्स टी शरीरासह त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतो. हा चहा प्यायल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे त्वचा तरुण आणि फ्रेश दिसते.

 

 

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.