Former cji dy chandrachud on pune bus rape case crimes will not stop just by making laws in marathi


महिलांसाठी केवळ कायदे करून काही होणार नाही तर अशा घटना रोखण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यावर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी भर दिला आहे.

DY Chandrachud On Pune Rape : पुणे : महिलांसाठी केवळ कायदे करून काही होणार नाही तर अशा घटना रोखण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यावर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी भर दिला आहे. दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणानंतर कायद्यात अनेक बदल करण्यात आले. मात्र, केवळ कायदे करणे पुरेसे नाही. पुण्यातीलच एका कार्यक्रमात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 2012 मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडाची आठवण काढली. ते म्हणाले की, महिलां विरोधातील गुन्हे केवळ कायदे करून थांबवता येणार नाहीत तर त्या कायद्यांचे काटेकोर पालन देखील गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांना स्वारगेट बलात्कार प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. (former cji dy chandrachud on pune bus rape case crimes will not stop just by making laws)

मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (MSRTC) शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून दत्तात्रय गाडे असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी 13 पथके तयार केली होती.

महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील तर केवळ कायदे बनवून काही होणार नाही तर त्यांची योग्य अंमलबजावणी देखील गरजेची आहे. निर्भया प्रकरणानंतर कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले. पण, केवळ कायदे करून काही होणार नाही. यावेळी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 2012 मधील निर्भया प्रकरणाचा उल्लेख केला. दिल्लीतील 23 वर्षीय फिजिओथेअरपीच्या विद्यार्थिनीवर अमानुष पद्धतीने बलात्कार झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होती. जगभरात या घटनेची चर्चा झाली होती. आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

याच प्रकरणाची आठवण काढत चंद्रचूड म्हणाले की, केवळ कायद्यांची व्यवस्था करून काहीही होणार नाही. तर समाज म्हणून समाजाची देखील मोठी जबाबदारी आहे. याशिवाय महिलांसाठी करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्यामुळे महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल. आज मोठ्या प्रमाणात महिला नोकरी, अभ्यास आणि अन्य कामांसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, ही आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.

कोणत्याही गुन्ह्याचा योग्य तपास, योग्य चौकशी, कठोर कारवाई, तात्काळ सुनावणी आणि कठोर शिक्षा देण्यात आली पाहिजे. त्यामुळेच अशा प्रकरणात कायदा व्यवस्था आणि पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. या प्रकरणांची मोठ्या गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ज्यामुळे महिला सुरक्षित वातावरणात काम करू शकतील. समानतेवर आधारित समाजाचा हाच पाया असल्याचेही ते म्हणाले.



Source link

Comments are closed.