Swargate came into limelight due to the rape case, know the history behind the name
स्वारगेटच्या इतिहासाचा आणि त्याला हे नाव कसे पडले, याचा उल्लेख लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी लिहिलेल्या “नावामागे दडलंय काय?” या पुस्तकात वाचायला मिळतो. या पुस्तकात विविध ठिकाणांच्या रंजक नावांमागचा इतिहास सांगण्यात आला आहे.
पुणे : मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना घडली. या प्रकरणी दत्तात्रय गाडे या नराधमाला घटनेच्या 70 तासांनंतर अटक करण्यात आली. परंतु, या प्रकरणानंतर पुण्यातील स्वारगेट परिसर सर्वांच्या चर्चेत आला आहे. खरं तर स्वारगेटला ऐतिहासिक वारसा आहे. शिवरायांच्या काळात या ठिकाणाला विशेष महत्त्व होते. पण आता घडलेल्या घटनेमुळे स्वारगेटमध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, या ठिकाणाला स्वारगेट नाव कसे पडले? हे आता जाणून घेऊया. (Swargate came into the limelight due to the rape case, know the history behind the name)
स्वारगेटच्या इतिहासाचा आणि त्याला हे नाव कसे पडले, याचा उल्लेख लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी लिहिलेल्या “नावामागे दडलंय काय?” या पुस्तकात वाचायला मिळतो. या पुस्तकात विविध ठिकाणांच्या रंजक नावांमागचा इतिहास सांगण्यात आला आहे. “नावामागे दडलंय काय?” या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, पुण्यात प्रवेश करण्यासाठीचा एक मार्ग हा आताच्या स्वारगेटवरून जात असे. शिवरायांच्या काळात पुण्याची वस्ती वाढू लागली होती. नवीन वस्ती तयार होऊ लागल्या होत्या. रस्ते बनू लागले होते. वाढत्या वस्तीमुळे गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त ठेवू जावू लागली. त्याकरिता घोडेस्वार तैनात करण्यास सुरुवात होती. अशा ठिकाणांना नाक्याचे ठिकाण किंवा पहारेकऱ्यांच्या चौक्या म्हणत असत.
हेही वाचा… Swargate Rape Case : दत्ता गाडेच्या अटकेवरून श्रेयवादाची लढाई? अमितेश कुमार म्हणाले…
पुण्यातील इंग्रजांच्या काळातील बरीचशी ठिकाणे तशीच राहिली आहेत. आणि त्या ठिकाणांचे महत्त्वही तसेच आहे. इंग्रजांच्या अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले आणि नाके किंवा चौकी, असे न राहता, त्याचे नाव ‘गेट’ असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेल्या नाक्याचे ठिकाण पुढे ‘स्वारगेट’ असे ओळखले जाऊ लागले. आजतागायत ते नाव तसेच राहिले आहे. लेखक सुप्रसाद पुराणिक सांगतात, इ.स. 1660 साली शायिस्तेखान पुण्यात आला, तेव्हा त्याने कात्रज घाट उतरल्यावर पहिली मोठी गस्तीची चौकी स्वारगेट परिसरात उभारली होती. मोठ्या फौजफाट्यासह त्याने पुण्यात तळ ठोकला होता. जेव्हा सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वसवली होती तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी, जकात वसूल करण्यासाठीसुद्धा होत असे. तर याच ठिकाणी घोडेस्वारांचे ठिकाणही होते. त्यामुळे या ठिकाणाला तेच नाव प्रचलित झाले आहे.
Comments are closed.