शुबमन गिलबद्दल मोठा खुलासा, भारतीय संघासाठी खुशखबर
शुबमन गिल भारतीय संघाचा शानदार फलंदाज आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी केली होती. तसेच त्याच्याबद्दल माहिती समोर येत होती की तो आजारी आहे आणि याच कारणामुळे तो ट्रेनिंग सेशन मध्ये देखील सामील झाला नव्हता. पण एका रिपोर्ट नुसार गिल आता पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि तो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मैदानावर खेळण्यासाठी उतरू शकतो,त्याने सराव देखील केला आहे.
इंडिया टुडे च्या एका माहितीनुसार शुबमन गिलने शुक्रवारी सराव केला आहे. तसेच त्याच्या आधी दोन दिवस तो सरावासाठी आला नव्हता. आता तो पूर्णपणे व्यवस्थित आहे. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तो खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या गैरहजेरीत शुबमन गिलला भारतीय संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे. शुबमनचे आतापर्यंत रेकॉर्ड पाहिले तर त्याचा खेळ अत्यंत चांगला आहे. तो न्यूझीलंड विरुद्ध कमालीची खेळी करू शकतो.
शुबमन गिलने यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील आत्तापर्यंत दोन सामने खेळले आहेत. शुबमनने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शानदार शतक लावले होते. त्याने नाबाद 101 धावांची पारी खेळली. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने 46 धावा केल्या. त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत त्याने भारतासाठी 52 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 2734 धावा केल्या आहेत. तसेच शुबमनने 8 शतके तर 15 अर्धशतके केली आहेत.
भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध त्यांचा शेवटचा गट सामना खेळेल. यानंतर दुबईमध्ये सेमीफायनल सामना खेळेल. भारतीय संघाचा सेमीफायनल सामना 4 मार्च रोजी आहे. पण त्यांचा सामना कोणत्या संघासोबत होईल हे अजून समोर आले नाही आणि स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा
चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाचा सर्वोत्तम खेळाडू – विराट नाही, हा स्टार गाजवतोय मैदान!
दुबईतील रंगतदार सामना: भारतीय आणि न्यूझीलंड संघांसाठी खेळपट्टी कशी असेल?
Comments are closed.