महायुतीत मतभेद… पक्षप्रवेशासाठी खेचाखेची; अशोक चव्हाणांचे नाव न घेता आमदार चिखलीकरांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेवू इच्छिणार्‍या अनेकांचा कानोसा लागल्यानंतर त्यांच्यावर धाकधपटशहा व दहशतीचे वातावरण निर्माण करुन व लालच दाखवून काही मंडळींनी त्यांचा प्रवेश रोखला, मात्र येणार्‍या काळात ही दहशत आपण संपुष्टात आणण्याचा विडा उचलला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीत मतभेद असून पक्षप्रवेशासाठी खेचाखेची सुरू असल्याचे उघड झाले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत चिखलीकरांचा पराभव झाल्यानंतर चिखलीकरांनी अजीत पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर अजीत पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेडात पहिलाच कार्यक्रम झाला. यावेळी बोलत असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांचा कानोसा लागल्यानंतर त्यांच्यावर धाकधपटशहा व दहशतीचे वातावरण निर्माण करुन व लालच दाखवून काही मंडळींनी त्यांचा प्रवेश रोखला, मात्र ही दहशत आपण संपूष्टात आणण्याचा विडा उचलला आहे, असे प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले

Comments are closed.