Swargate ST depot rape case accused datta gade attempted suicide twice news
दत्ता गाडेला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. दत्ता गाडेने अटक होण्यापूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे.
पुणे : स्वारगेट एसटी डेपोतील एका नादुरुस्त शिवशाही बसमध्ये 25 फेब्रुवारी रोजी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार घटना घडली. या घटनेप्रकरणी तब्बल 70 तासांनंतर आरोपी दत्ता गाडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दत्ता गाडेला त्याच्या गुणाट गावात रात्री दीडच्या सुमारास अटक केली. यानंतर आज (28 फेब्रुवारीला) दत्ता गाडेला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. दत्ता गाडेने अटक होण्यापूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. (Swargate ST depot rape case accused datta gade attempted suicide twice news)
स्वारगेट लैंगिक अत्याचार घटनेच्या 48 तासांनंतरही दत्ता गाडे हा सापडत नसल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांची 13 पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तो राहात असलेल्या घरी आणि त्याच्या नातेवाईकाच्या घरी जाऊन पाहणी केली. यानंतर दत्ता गाडे नातेवाईकाच्या घरासमोर असलेल्या ऊसाच्या शेतात तो लपून बसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यामुळे दत्ता गाडेला पकडण्यासाठी तब्बल 100 पोलीस गुणाट गावात पोहोचले. ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यात आला, परंतु तो काही सापडला नाही. दिवसभर गुणाट गावातील सर्व शेत पोलिसांनी पिंजून काढले. तसच डॉग स्कॉडसुद्धा मागवण्यात आले मात्र तरीही दत्ता गाडे काही सापडला नाही. अखेर दत्ता गाडेला गुरुवारी (28 फेब्रुवारी) मध्यरात्री अटक करण्यात आली.
हेही वाचा – Swargate Rape Case : दत्ता गाडेच्या अटकेवरून श्रेयवादाची लढाई? अमितेश कुमार म्हणाले…
दत्ता गाडेला आज शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याआधी त्याची लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. याठिकाणी पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा आणि पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील उपस्थित आहेत. दत्ता गाडेला न्यायालयात हजर करण्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालानुसार, दत्ता गाडेच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता गाडेने अटकेपूर्वी शेतात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोरी तुटल्याने हा प्रयत्न फसला. महत्त्वाचे म्हणजे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही आरोपीच्या गळ्यावर व्रण असल्याची पुष्टी केली आहे. याशिवाय दत्ता गाडेला ज्यावेळी अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्या हातात किटकनाशकाच्या औषधाची बॉटल आढळून आल्याचा दावा गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे दत्ता गाडे याने खरंच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता का? याची चौकशी करण्याकरता घटनास्थळी पथक पाठवण्यात येणार आहे, अशी माहितीही अमितेश कुमार यांनी दिली.
हेही वाचा – Swargate Bus Depo : बलात्कार प्रकरणामुळे चर्चेत आलं स्वारगेट, जाणून घ्या नावामागचा इतिहास
Comments are closed.