न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? 'या' स्टार खेळाडूला मिळणार संधी?
सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) ही स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगा स्पर्धेत सहभागी आहे, ज्यामध्ये संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच दमदार राहिली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात शानदार विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये थाटात एँट्री केली.
भारतीय संघ आता आपला शेवटचा गट सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) भारताच्या प्लेइंग 11 मधील बदलाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मोठे उत्तर दिले.
भारताने बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात अगदी एकतर्फी विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाची प्लेइंग 11 सारखीच होती. पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी सामन्यात काही खेळाडूंना त्यांची चाचणी घेण्याच्या उद्देशाने भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
पत्रकार परिषदेत बोलताना केएल राहुल म्हणाला की, “सेमीफायनलपूर्वी वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावण्याचा मोह होतो पण मला खात्री आहे की ते होणार नाही. सेमीफायनल फार दूर नाही म्हणून तुम्हाला खेळाडूंना शक्य तितका वेळ मिळावा असे वाटेल. मला तेच वाटते पण परिस्थिती बदलू शकते कारण मी नेतृत्व गटाचा भाग नाही.”
यासोबतच, केएल राहुलने रिषभ पंतमुळे त्याच्यावर असलेल्या दबावाबद्दलही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “हो, दबाव आहे, पण मी त्याच्याशी स्पर्धा करण्याचा किंवा त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि मला खात्री आहे की जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तोही असाच विचार करेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान-बांग्लादेशचं वर्चस्व संपलं? आता आशियातील भारतानंतर सर्वश्रेष्ठ टीम कोणती?
PCB मोठ्या निर्णयाच्या तयारीत, पाकिस्तान संघाच्या संपूर्ण कोचिंग स्टाफवर गंडांतर!
शुबमन गिलबद्दल मोठा खुलासा, भारतीय संघासाठी खुशखबर
Comments are closed.