व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘आपले सरकार’च्या 500 सेवा

‘आपले सरकार’ पोर्टलवरील 500 हून अधिक सेवा थेट व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बीकेसी येथे ‘आपले सरकार व्हॉट्सअॅप चॅटबॉट’संदर्भात माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि ‘मेटा’ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर एमएमआरडीए आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एमएमआरडीएने एनपीसीआय्यला बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हबसंदर्भात सामंजस्य करार झाला आहे.
Comments are closed.