तुम्हाला आयाबहिणी आहेत की नाहीत? मंत्री योगेश कदम, संजय सावकारे यांच्याविरोधात प्रचंड संताप

पुणे स्वारगेट येथे एसटी बसमध्ये तरुणीवर झालेला बलात्कार शांततेत पार पडला, असे वादग्रस्त विधान गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. वस्त्रौद्योगमंत्री संजय सावकारे यांनीही ‘अशा घटना होतच असतात,’ असे म्हणत त्यावर कहरच केला. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या या असंवेदनशीलतेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तीव्र निषेध होत आहे. ह्यांना आयाबहिणी आहेत की नाहीत, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची पाठराखण केली असली तरी विरोधी पक्षांनी मात्र वादळ निर्माण केले आहे. योगेश कदम आणि संजय सावकारे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
योगेश कदम यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे, असे म्हणत मिंधे गटाचे शहाजी बापू पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. काहीच गोंधळ झाला नाही असे म्हणण्यापेक्षा त्या मुलीवर आरोपीने प्रचंड दबाव टाकून अत्याचार केला असेल हे त्यांनी समजायला हवे होते, असे पाटील म्हणाले.
Comments are closed.