WPL 2025: दिल्लीचा धमाकेदार परफॉर्मन्स, मुंबईवर एकतर्फी वर्चस्व, गुणतालिकेत अव्वलस्थानी
डब्ल्यूपीएल 2025 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने दारुण पराभव केला. या सामन्यात, मेग लॅनिंगने दिल्लीसाठी कर्णधारपदाची खेळी खेळली. तिने संघाला शानदार विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो योग्य ठरला. मुंबई संघ 20 षटकांत फक्त 123 धावाच करू शकला. यानंतर, दिल्लीने एक विकेट गमावून हे लक्ष्य सहज गाठले. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकल्याने मोठा फायदा झाला आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयासह, दिल्ली कॅपिटल्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दिल्ली संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. संघाचे सध्या 8 गुण आहेत. तर नेट रन रेट अधिक 0.201 आहे. मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. आरसीबी संघ तिसऱ्या स्थानावर, यूपी वॉरियर्स संघ चाैथ्या स्थानावर आणि गुजरात जायंट्स संघ शेवटच्या स्थानावर आहे. तिन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण समान आहेत.
दिल्ली कॅपिटल्सकडून शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी 83 धावांची सलामी भागीदारी केली. या दोघांनी दिल्ली संघाच्या विजयाचा पाया रचला. ज्यात मेग लॅनिंगने 49 चेंडूत 60 धावांची खेळी खेळली. ती शेवटपर्यंत नाबाद राहिली. तिच्या व्यतिरिक्त, शेफालीने 43 धावांचे योगदान दिले. जेमिमा रॉड्रिग्जने 15* धावा केल्या. अशाप्रकारे शानदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली संघ सामना जिंकण्यात यशस्वी झाला.
दिल्ली कॅपिटल – डब्ल्यूपीएल 2025 मधील पॉइंट्स टेबलच्या शीर्षस्थानी pic.twitter.com/ha2att7uji
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 28 फेब्रुवारी, 2025
मुंबई इंडियन्सकडून कोणताही खेळाडू सातत्याने फलंदाजी करू शकला नाही. हेली मॅथ्यूज आणि हरमनप्रीत कौरने 22 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंना चांगली सुरुवात मिळाली, पण ते त्याचे मोठ्या डावात रूपांतर करू शकले नाहीत. अमेलिया केर आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. 20 षटकांनंतर मुंबई इंडियन्स संघाला फक्त 123 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मिन्नू मनीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा-
‘तुम्ही ट्रोलिंगला कसं सामोरे जाता?’ केएल राहुलच्या उत्तरानं जिंकली चाहत्यांची मनं!
अफगाणिस्तानच्या आशा जिंवत, इंग्लंडच्या मोठ्या विजयाने उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा?
ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना अनिर्णित! ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये एँट्री
Comments are closed.