Fashion Tips- उन्हाळ्यात लॉंग लास्टींग मेकअपसाठी टीप्स
उन्हाळ्यात उष्ण हवामानामुळे आपल्याला सतत घाम येतो. त्यामुळे चेहऱ्यावरील मेकअपही बिघडतो. यामुळे जर तुम्हाला या सिझनमध्ये मेकअप अधिक वेळ टिकवून ठेवायचा असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.
बर्फ घन
उन्हाळ्यात मेकअप करण्याआधी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. किंवा जर शक्य असेल तर आईस क्यूबने चेहऱ्यावर हलका मसाज करावा. त्यामुळे चेहऱ्यावर घाम येणार नाही.
आधार
उन्हाळ्याच्या दिवसात बेस न लावता मेकअप करू नये. यादिवसात जास्त हॅवी फाऊंडेशनचा वापर टाळावा. त्याजागी तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीम या वॉटर बेस्ड फाउंडेशनचा वापर करावा.
पावडर
चेहऱ्याच्या या भागांवर जास्त घाम येतो त्यावर पावडर लावावी. त्यामुळे पावडर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही शोषून घेते. त्यामुळे चेहरा चमकणार नाही आणि मेकअप जास्त वेळ टिकेल.
वॉटरप्रूफ मेकअप
हल्ली बाजारात वॉटरप्रूफ मेकअप सहज उपलब्ध आहेत. तुम्ही या सिझनमध्ये त्याचाही वापर करू शकता. फक्त वॉटरप्रूफ मेकअप केल्यानंतर सेटिंग स्प्रे ने तो सेट करून घ्यावा. त्यामुळे लूक खराब होत नाही.
बहिष्कृत पेपर
उन्हाळ्याच्या दिवसात जवळ ब्लॉटींग पेपर नक्की ठेवावा. चेहऱ्यावर घाम आल्यास या पेपरने लगेच तो टिपता येतो.
Comments are closed.