‘मला सोडा, ती विनंती करत होती, पण तो..’; पोलिसांनी कोर्टात गाडेच्या विकृतीचा सांगितला घटनाक्रम

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे: पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शुक्रवारी ताब्यात घेतलं. त्याला गुनाट या गावातून रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास तो जाळ्यात सापडला. त्यानंतर त्याला आज पुण्यातील शिवाजी न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. यावेळी पोलिसांनी त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील आणि आरोपी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, काल कोर्टात झालेल्या युक्तीवादामध्ये दोन्ही बाजुने झालेल्या युक्तीवादानंतर मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी कोर्टात सांगितले की, एकीकडे तरुणीने आरोपीला विनंतीही केली की मला बाहेर सोडा. पण आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. तर दुसरीकडे दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वकील म्हणाले, या घटनेनंतर बसमधून दोघे व्यवस्थित बाहेर आले. नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली. हे सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. या दोघांच्या युक्तीवादानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

कंडक्टर असल्याचं सांगितलं, ताई म्हणून विश्वास संपादन केला

स्वारगेट बसमधील बलात्कार प्रकरणातील प्रकरणाचे तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी या घटनेविषयी सविस्तर माहिती कोर्टात न्यायाधीशांपुढे मांडली आहे. 25 फेब्रुवारीला स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली आहे. त्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेतील फिर्यादी मूळगावी जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडवर आल्या होत्या. अचानक एक व्यक्ती या पीडित तरुणीच्या जवळ आला, त्याने तिला विचारलं ताई कुठं जायचं आहे. कंडक्टर म्हणून फिर्यादीला बोलत होता, ताई म्हणून विश्वास संपादन करत होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुढे युवराज नांद्रे म्हणाले, फिर्यादीला बस आरोपीने दाखवली होती. बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्याने सांगितलं होतं. पण, बस पूर्ण रिकामी होती. फिर्यादीने बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तरुणीने आरोपीला विनंतीही केली, मला बाहेर सोडा. पण आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्याने पीडितेला मारहाण करुन दोन वेळा लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचार करून तो पळून गेला होता. त्यानंतर मित्राच्या सांगण्यावरून फिर्यादीने तक्रार दिली आणि पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले आहे. दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. आरोपी अत्यंत सराईत आहे. तो मोबाईल बंद करून फिरत होता. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध; आरोपीच्या वकिलांचा दावा

न्यायालयाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा मोठा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले, या घटनेनंतर बसमधून दोघे व्यवस्थित बाहेर आले. नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली. हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. तर सखोल चौकशीसाठी कोठडी मागितल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे  

सीसीटीव्हीत ती मुलगी स्वतःहून बसमध्ये चढली व त्यापाठीमागे आरोपी चढला असे सांगत घटनेवर प्रश्वचिव्ह निर्माण केले. तसेच सहमतीने संबंध झाल्याचे आरोपीच्या वकिलांनी सांगितले. आरोपीचा टीव्हीवर चेहरा दाखवल्याने टी /आय पीरेड चा प्रश्न राहत नाही. आरोपीवर असलेले गुन्हे सिद्ध नाहीत. त्यामुळे सराईत म्हणता येणार नाही. त्यामुळे दोन दिवसांची कोठडी पुरेशी असताना 14 दिवस कोठडीची आवश्यकता नाही. असा युक्तीवाद करत आरोपीच्या वकिलांनी विरोध केला होता. 

Comments are closed.