Champions Trophy 2025: रोहित शर्माचा पत्ता कट? शुबमन गील टीम इंडियाचा कर्णधार!
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा (Champions Trophy 2025) शेवटचा साखळी सामना होणार आहे. 2 मार्च रोजी हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई इथे होणार आहे. दोनही संघ साखळी फेरीत अपराजित आहेत. या सामन्यात भारतीय संघात मोठा उलटफेर दिसू शकतो.
शुबमन असेल कर्णधार?
या सामन्यात भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय खेळताना दिसू शकतो. त्याऐवजी उपकर्णधार शुबमन गीलकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते. याला कारण म्हणजे या सामन्यात रोहितला विश्रांती दिली जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार रोहितचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे गेल्या सामन्यात काही वेळ बाहेर गेला होता.
राहुलने दिली वेगळीच माहिती
याबद्दल न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी काल (28 फेब्रुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत केएल राहुलने मात्र वेगळीच माहिती दिली. ‘संघात बदल होऊ शकतात परंतू चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये संघात बदल सहसा केले जात नाहीत,’ असे तो म्हणाला.
पंतला मिळू शकते संधी
रोहितला जर विश्रांती दिली तर संघात रिषभ पंतला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. या स्पर्धेत पंत अजून एकही सामना खेळलेला नाही. पंतला जरी संधी मिळाली तरी तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो, तर शुबमन गीलबरोबर केएल राहुल सलामीला फलंदाजीला येऊ शकतो.
यापुर्वीच टीम इंडिया उपांत्यपुर्व फेरीत
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. टीमने पहिल्या सामन्यात बांगलादेश व दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. याचबरोबर भारतीय संघाने उपांत्यफेरीत प्रवेश देखील यापुर्वीच निश्चित केला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा संभाव्य प्लेइंग-11
शुबमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, ish षभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षत राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
हेही वाचा-
किंग कोहली पुन्हा इतिहास रचणार? न्यूझीलंडविरुद्ध मोडू शकतो हे 3 महान विक्रम!
ऑस्ट्रेलियाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित!
“विराटची महानता शब्दांपलीकडे”, न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी केएल राहुलचे खास विधान
Comments are closed.