मोठी बातमी! खंडणी ॲट्रॉसिटी अन् संतोष देशमुख हत्येची साखळी एकच, आरोपपत्रातून CID चा मोठा उल्लेख

संतोष देशमुख प्रकरण: संतोष देशमुख हत्या प्रकरणात 1400 पानी आरोपपत्र आता ‘ABP माझा’ च्या हाती आलं आहे. या तपासात महत्वाचे गौप्यस्फोट झाले असून या हत्येचा सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं आता स्पष्ट झालंय. या आराेपपत्रातील होणाऱ्या उल्लेखांमधून मोठे उलगडे झाले असून खंडणी, ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येची साखळी एकच असल्याचा मोठा उलगडा आता खुद्द सीआयडीने केल्याने सारेच चित्र स्पष्ट झाले आहे. (CID Chargesheet) संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी,ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे .

या संपूर्ण प्रकरणात मोठे मुद्दे समोर आले आहेत. याआधी या तिन्ही घटनांचा वेगवेगळ्या तपास केला जात होता . खंडणी ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्र करून त्याचा तपास केला जातोय .आरोप पत्रातून मोठे धागेदोरे समोर आले आहेत . हे तिन्ही प्रकरणं आधी वेगळे होते त्यामुळे या तिन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे आरोपपत्र दाखल व्हायला हवे होते .मात्र , सीआयडीच्या तपासात या तिन्ही घटना एकमेकांना पूरक असल्याचं लक्षात आल्यानंतर या तीनही प्रकरणांचा एकत्रित उल्लेख करण्यात आलाय . (Beed)

80 दिवसातच चार्जशीट दाखल

मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची मुभा तपास एजन्सीला असते . मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात केवळ 80 दिवसात चार्जशीट दाखल झाली .या संपूर्ण प्रकरणात पहिल्यांदा दाखल झालेला खंडणीचा गुन्हा हा ॲट्रॉसिटीशी सुसंगत होता .ॲट्रॉसिटी चा मारहाणेशी आणि मारहाणीचा हत्येशी अशी  गुन्ह्यांच्या साखळीचा मोठा उलगडा आरोप पत्रात झालाय .हे तीन गुन्हे एकमेकांपासून वेगळे असल्यास ते तर तीन चार्जशीट दाखल झाले असत्या मात्र सीआयडीने या तीनही प्रकरणांचा एकत्रित उल्लेख केलंय .

काय होता गुन्ह्यांचा घटनाक्रम?

  • 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याचे समोर आले . त्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झाला .
  • 6 डिसेंबरला संतोष देशमुख सुदर्शन घुले , प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला .त्यानंतर संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाली .मारहाणीच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली होती .
  • 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली .हत्येचा गुन्हा वेगळा होता .या प्रकरणातील 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराडविरुद्ध पुरावे मिळाले . खंडणी दिली नाही म्हणूनच संतोष देशमुख यांना मारहाण झाली व त्यांची हत्या करण्यात आली हे स्पष्टपणे उघड झाल्याने या तीनही प्रकरणांचा एकत्रित उल्लेख आरोप पत्रात करण्यात आल्याने सारेच चित्र स्पष्ट झाले आहे .

या आरोपपत्रामधून वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे वाल्मीक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेला आहे.

https://www.youtube.com/watch?v=rhjkmr_vewi

हेही वाचा:

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट

अधिक पाहा..

Comments are closed.