Ajit pawar asks for patience to everyone what he exactly says in marathi


Ajit Pawar On मराठी : पुणे : पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात भगवा फडकवायचा आहे, असे विधान केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ते भडकले. माहिती पोहोचवणे हे माध्यमांचे काम आहे, असे सांगतानाच तारतम्याने बातम्या द्या, जरा सबुरी ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यातील शासकीय, निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी उपस्थित उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (ajit pawar asks for patience to everyone what he exactly says)

प्रसार माध्यमांना सबुरीचा सल्ला देतानाच हे असले धंदे बंद करून खऱ्या बातम्या द्या, असेही अजित पवारांनी सांगितले. स्वारगेट प्रकरणावरूनही ते म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात अनेक घटना घडल्या. मात्र, कोणतीही घटना घडली की त्यावर पोलिसांचा रिपोर्ट येऊ द्या, त्यासाठी थोडं थांबा. कोणत्याही गोष्टीत उतावीळपणा, आततायीपणा करू नका, सबुरीने घेतलं तर बरं होईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Mumbai Megablock : मुंबईकरांसाठी वीकेंड ब्लॉक, पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मोठे बदल, वाचा सविस्तर –

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाबाबत ते म्हणाले की, आम्ही महायुती म्हणून सत्तेत आहोत. जनतेने आम्हाला मोठे बहुमत देऊन निवडून गेले आहेत. असे असले तरी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आणि आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी तसे विधान केले असेल, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंप्रमाणेच देवेंद्र फडणवीसही राज्यभरात जिथे जातील तिथे भाजपचा झेंडा फडकवायचा असे सांगू शकतील. आणि मी जिथे जाईन तिथे राष्ट्रवादीचा झेंडा आणायचा आहे, असं सांगू शकतो. त्यामुळे एकत्र जरी असलो तरी आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

तुम्ही कितीही उलट सुलट प्रश्न विचारले तरी आम्ही एकजुटीने, एकत्र राहायचं ठरवलं आहे, त्यामुळे तुमच्या अशा प्रश्नांचा आमच्यावर युतीवर काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. शेवटी सत्ता कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय, जनता जनार्दन घेणार आहे. आणि आम्ही जनतेच्या निर्णयाचा आदर करून, जनतेच्या हिताचा विचार करून, त्यांचं हित डोक्यात ठेवूनच राज्यकारभार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Sanjay Raut : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा नाही तर हक्कच, राऊतांनी स्पष्टच सांगितले

पत्रकारांना सबुरीचा सल्ला देता, हाच सल्ला मंत्र्यांना देणार का, असे विचारले असता अजित पवार यांनी सांगितले की, माझ्यासकट सगळ्यांना मी हाच सल्ला देईन.



Source link

Comments are closed.