Sanjay Raut response to Ramdas Kadam statement to expel Uddhav Thackeray from Maharashtra


भविष्यात महाराष्ट्रातून देखील उद्धव ठाकरेंना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केले होते. पण त्यांच्या या विधानाला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिक : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने ठाकरे गटाला आणि उद्धव ठाकरे यांना कोकणातून हद्दपार केले आहे. भविष्यात महाराष्ट्रातून देखील उद्धव ठाकरेंना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केले होते. पण त्यांच्या या विधानाला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम यांच्या नावाचाही उल्लेख न करता राऊतांनी त्यांचे हे फडफडणे तात्पुरते असून त्यांना मातोश्रीच्या दारावर यावेच लागेल, असा दावा केला आहे. खासदार राऊतांनी शनिवारी (ता. 01 मार्च) नाशिक येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले. (Sanjay Raut response to Ramdas Kadam statement to expel Uddhav Thackeray from Maharashtra)

प्रसार माध्यमांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या विधानाबाबत विचारणा केली. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्यांच्या आयुष्यातील ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावेत. आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमानेइतबारे राहिलेले आहेत, आमच्यात एवढे बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहे, जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघाले आहेत, दिल्लीच्या मोघलाईबरोबर हातमिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आम्हाला दिलेली आहे. हे जे यांचे फडफडणे आहे, तात्पुरते आहे. एक दिवस यांना पुन्हा मातोश्रीच्या दारावर, शिवसेना भवनाच्या दारावर यावे लागेल, तिथे उभे राहावे लागेल, हे माझे भाकित नसून हा माझा दावा आहे, असे प्रत्युत्तर राऊतांकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा नाही तर हक्कच, राऊतांनी स्पष्टच सांगितले

त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय…

यावेळी खासदार राऊतांना मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुद्धा विचारणा करण्यात आली. त्याबाबत ते म्हणाले की, कायद्याने माणिकराव कोकाटे अपात्र ठरले आहेत, त्यांची धडपड सुरू आहे, मंत्रिपद वाचावे यासाठी. नियम आणि कायदा पाहिला तर सुनील केदार यांची आमदारकी 24 तासामध्ये गेली. राहुल गांधी यांची खासदारकी गेली. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच आजम खान यांची आमदारकी 24 तासांमध्ये गेली. हे भाजपानेच केले. पण इथे मात्र पूर्ण संधी दिली जात आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी. तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना अभय दिले जात आहे, असे वाटते का? तर हो नक्कीच असे वाटत आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. पण मला असे वाटते की, अजूनही आमचा न्याय यंत्रणेवर विश्वास आहे. न्यायालयात हे प्रकरण आहे आणि न्यायालय यांना सोडणार नाही, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.



Source link

Comments are closed.