“धनंजय मुंडे यांनी डोकं लावून…”, आरोपपत्र दाखल होताच अंजली दमानिया आक्रमक, CM-DCM चा उल्लेख करत म्हणाल्या…

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचेही यात नमूद करण्यात आले. तसेच खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरण असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आरोपपत्रामध्ये हे तीनही गुन्हे एकत्रित करण्यात आले आहेत. यावर माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘राजकीय दबाव होता म्हणून तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. हा दबाव धनंजय मुंडे यांचाच होता. त्यामुळे पहिल्या दिवसापासून मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते.’
बीडमध्ये प्रत्येक दुकानदाराकडून खंडणी, हप्ते फिक्स असतात. यामागे मोठे सिंडेकेट असून हे कोणाच्या आशईर्वादाने? हे फक्त धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने असून संतोष देशमुख प्रकरातही तीन गुन्हे वेगळे करण्यामागेही राजकीय दबाव होता. हे तीनही गुन्हे कधीच वेगळे नव्हते. वाल्मीक कराडला वाचवायचे म्हणून धनंजय मुंडे यांनी डोके लावून हे गुन्हे वेगवेगळए करायला लावले हा माझा आरोप आहे. आता जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्राने पेटून उठले पाहिजे, असेही अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या.
Comments are closed.