महान सचिन तेंडुलकरचा रेकाॅर्ड मोडण्याची रोहित शर्माला संधी! कर्णधार म्हणून करणार मोठी कामगिरी

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) 12व्या सामन्यात भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ आमने-सामने असणार आहेत. दरम्यान दोन्ही संघ उद्या म्हणजेच रविवारी (2 मार्च) रोजी दुबईच्या मैदानावर भिडतील. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) महान सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकाॅर्ड मोडण्याची संधी आहे.

रोहित शर्माला सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून सचिन तेंडुलकरचा रेकाॅर्ड मोडण्याची संधी आहे. सचिनला मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला 68 धावांची गरज आहे. तेंडुलकरने 73 सामन्यांमध्ये 37.75च्या सरासरीने 2,454 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 12 अर्धशतकांसह 6 शतके झळकावली आहेत.

रोहित शर्मा (Rohit Sharma) 53 वनडे सामन्यांमध्ये 53.04च्या सरासरीसह 113.50च्या स्ट्राईक रेटने 2,387 धावा करून कर्णधार म्हणून सातव्या स्थानी आहे. रोहितने 16 अर्धशतकांसह 5 शतके झळकावली आहेत. या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) पहिल्या स्थानावर आहे. धोनीने 6,641 धावा केल्या आहेत. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) 5,549 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार-

1) समोर 6,641 हल्ल्यात सुश्री धोनी- 200
2) विराट कोहली- 5,449 हल्ल्यांसमोर 95
)) मोहम्मद अझरुद्दीन- ,, २ deastions हल्ल्यांसमोर १44
4) सौरव गांगुली- 146 सामने 5,082 धावा
5) राहुल द्रविड- 79 सामने 2,658 धावा
6) सचिन तेंडुलकर- 73 सामने 2,454 धावा
7) रोहित शर्मा- 53 समोर 2,387 हल्ला

महत्त्वाच्या बातम्या-

धनश्रीसोबतचे नाते तुटणार? चहलच्या शब्दांमागचं गूढ काय?
ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक पराक्रम, 19 वर्षे जुना डेमियन मार्टिनचा विक्रम मोडला!
IND vs NZ: मोहम्मद शमीला मिळणार विश्रांती, या डावखुऱ्या गोलंदाजाची होणार एँट्री?

Comments are closed.