Samruddhi Expressway Washim district 65 accident in 47 days of Mahakumbh Mela


अकोला : नुकतेच उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभचा महामेळा पार पडला. यावेळी देशभरातील करोडो भाविकांनी या महामेळ्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातूनही अनेक भाविक महाकुंभच्या मेळ्यामध्ये सहभागी झाले होते. अशामध्ये असंख्य भाविकांनी समृद्धी महामार्गाचा आधार घेतला. पण, यावेळी या मार्गावर अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. फक्त वाशीम जिल्ह्यामध्ये 47 दिवसांमध्ये 65 अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये 7 जणांचा बळी गेला असून 67 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा चिंतेचा विषय बनला आहे. (Samruddhi Expressway Washim district 65 accident in 47 days of Mahakumbh Mela)

हेही वाचा : Ajit Pawar : तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा अन् माझ्यासकट सगळ्यांनी…, काय म्हणाले अजित पवार 

मुंबई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 8 तासांत व्हावा, यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली होती. हा महामार्ग तब्बल दहा जिल्ह्यांमधील 390 गावांना जोडतो. यावेळी समृद्धी महामार्गाची निर्मिती करताना अत्याधुनिक पद्धतींचा वापर करण्यात आला होता. हा महामार्ग नियमित घडणाऱ्या अपघातांमुळे अधिक चर्चेत आला आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी अपघातासाठी मानवी चुकांसह अनेक कारणे समोर आली आहेत. सातत्याने होणाऱ्या या अपघातांवरून प्रशासनाकडून अनेक उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या आहेत. पण, तरीही समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही.

मध्य प्रदेशातील प्रयागराजमध्ये या काळात समृद्धीवरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवल्या गेल्या. त्यासोबतच समृद्धी महामार्गावरील अपघात देखील प्रचंड प्रमाणात वाढले. अशामध्ये वाशीम जिल्ह्यामध्ये गेल्या 47 दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 65 अपघात घडल्याचे समोर आले आहे. त्या अपघातांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला, तर 67 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे. 10 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात प्राणांतिक आणि गंभीर दुखापतीचे 5 अपघात घडले. किरकोळ दुखापतीच्या 24 अपघातांमध्ये 44 जण जखमी झाले आहेत. समृद्धीवर जिल्ह्यामध्ये घडलेल्या विनादुखापत अपघातांची संख्या 36 आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे निर्माण झाले. समृद्धी महामार्गावरील प्रवास विनाअडथळा पूर्ण होतो. त्यामुळे वाहन चालकदेखील निर्धास्त राहतात. लवकर प्रवास पूर्ण करण्यासाठी चालक थांबा न घेता अनेक तास वाहन चालवत असतात. थकव्यामुळे चालकाला डुलकी लागून अपघाताचा अनर्थ घडतो. महाकुंभमेळासाठी गेलेल्या भाविकांचे आणि इतरही बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागल्यामुळेच घडल्याचे समोर आले. त्यामुळे समृद्धीवरून प्रवास करतांना चालकाने योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.



Source link

Comments are closed.