वनडे क्रिकेटमध्ये सर्वात्कृष्ट कोण? सचिन की विराट? माजी क्रिकेटपटूने दिले उत्तर
सध्या भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) खेळण्यात व्यस्त आहे. या मेगा स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारताने चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश संघाला लोळवून दोन्ही सामन्यात शानदार विजय मिळवला.
शेवटच्या झालेल्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद शतक झळकावले होते. हे शतक कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील 51वे शतक होते. तत्पूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरकेर यांनी महान सचिन तेंडुलकर (Sachin Tendulakr) आणि विराट कोहलीदबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकर यांचा असा विश्वास आहे की, विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करण्यात महान सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला आहे. यासोबतच त्याने असे का वाटते हे देखील त्यांनी सांगितले.
‘इंडिया टुडे’च्या बातमीनुसार, मांजरेकर म्हणाले की, ते दोघेही वनडे क्रिकेटमधील दोन महान खेळाडू आहेत. पण त्याचा असा विश्वास आहे की कोहलीने सचिनपेक्षा जास्त दबाव असलेल्या सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करून भारताला वनडे सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.
मांजरेकर म्हणाले की, कोहलीची धावांचा पाठलाग करण्याची क्षमता अतुलनीय आहे. वनडे सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना कोहलीने 105 सामन्यांमध्ये 89.59च्या सरासरीने 5,913 धावा केल्या आहेत. तर सचिनने 127 सामन्यांमध्ये 55.45 च्या सरासरीने 5,490 धावा केल्या आहेत.
मांजरेकर म्हणाले की, सचिनने धावांचा पाठलाग करताना भारताला सामने जिंकण्यास मदत केली आहे. पण कोहलीने त्याच्यापेक्षा जास्त सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. तो म्हणाला की कोहलीने अनेक सामन्यांमध्ये शेवटपर्यंत नाबाद राहून भारताला विजय मिळवून दिला आहे.
कोहलीने सचिनचा वनडे क्रिकेटमध्ये शतके करण्याचा रेकाॅर्ड आधीच मोडला आहे. कोहलीने आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये 51 शतके झळकावली. आहेत. सचिनने 49 शतके ठोकल्यानंतर निवृत्ती घेतली. सचिनने भारतासाठी यशस्वी धावांचा पाठलाग करताना 14 शतके झळकावली आहेत. कोहलीने 24 शतके झळकावून भारतीय संघाला विजयाकडे नेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा फिटनेस अपडेट: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज?
महान सचिन तेंडुलकरचा रेकाॅर्ड मोडण्याची रोहित शर्माला संधी! कर्णधार म्हणून करणार मोठी कामगिरी
ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक पराक्रम, 19 वर्षे जुना डेमियन मार्टिनचा विक्रम मोडला!
Comments are closed.