धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसे राजकारणात असली तर अनेक वाल्मीक कराड तयार होतील; अंजली दमानिया यांचा आरोप

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून दिसून येत आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसे राजकारणात असली तर अनेक वाल्मीक कराड तयार होतील, असे त्यांनी म्हटले आहे. सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अंजली दमानिया पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, आता आरोपपत्र दाखल झाले आहे. धनंजय मुंडे यांना कराडला वाचवायचे होते, यासाठी वेगवेगळे गुन्हे दाखल केले. धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसे राजकारणात असली तर अनेक वाल्मिक कराड तयार होतील. 10 वर्ष या सर्वांचे सिंडीकेट होते, असा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडे यांना बडतर्फ करावे. वाल्मिक कराड हाच खरा यात सूत्रधार होता. सातपुडा येथे बैठक झालेली होती. बीडमध्ये 107 अधिकाऱ्यांनी बदली करून घेतली. जर सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. धनंजय मुंडे यांचे अस्तित्व कराडमुळेच आहे. या प्रकरणात राजकीय दबाव होता. ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्यानेच हे घडले, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. वाल्मीक कराड आज मोठा होण्यामागचे कारण फक्त आणि फक्त धनंजय मुंडेच आहे. त्यांच्याशिवाय दुसरं-तिसरं कोणीही नाही, असे त्यांनी म्हटले.
Comments are closed.