Champions Trophy: भारत विरूद्ध न्यूझीलंड कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकार्ड्स
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत 2 मार्च रोजी भारत विरुद्ध न्युझीलँड सामना दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर हे ठरणार आहे की, सेमीफायनल सामने कोणत्या संघांमध्ये खेळले जाणार आहेत. जर भारतीय संघ जिंकला तर त्यांचा सामना ब गटातील दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघाशी होईल आणि जर भारतीय संघ पराभूत झाला तर, त्यांना ब गटातील टॉपच्या संघाशी सामना खेळावा लागेल. भारत आणि न्यूझीलंड वनडेमध्ये याआधी किती वेळा समोरा- समोर आले आहेत आणि कोणत्या संघाच पारडं जड आहे ते जाणून घेऊया.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशला पराभूत केले. तसेच भारत संघाने पहिल्यांदा बांगलादेश आणि नंतर पाकिस्तानला पराभूत केले. दोन्ही सामने जिंकण्यासाठी दोन्ही संघांना जास्त त्रास झाला नाही. भारत आणि न्यूझीलंड संघाचे 4- 4 पॉईंट्स आहेत. पण चांगल्या नेट रन रेट नुसार न्युझीलंड संघ अ गटातील टॉपचा संघ आहे.
वनडेमध्ये भारत न्यूझीलंड संघाने 118 सामने खेळले आहेत.यामध्ये भारतीय संघाचं पारडं जड आहे. भारतीय संघाने 60 सामने जिंकले असून 50 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. 2 मार्च रोजी होणारा सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे. या आधी मागील 10 सामन्यांचे आकडे पाहिले तर भारतीय संघ पुढे आहे. तसेच 10 सामन्यात भारतीय संघाने 5 वेळा तर न्यूझीलंडने 3 वेळा विजय मिळवलेला आहे.
न्यूझीलंडसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू टॉम लैथम आहे. त्याने दोन सामन्यात एकूण 173 धावा केल्या आहेत. तसेच भारतासाठी शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने दोन सामन्यात 147 धावा केल्या आहेत.
गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, मोहम्मद शमीने दोन सामन्यात 5 विकेट्स घेऊन भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. त्याने 5 विकेट्स बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडसाठी मायकल ब्रेसवेल याने दोन सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा
IPL 2025: आरसीबीचे 11.50 कोटी पाण्यात? या स्टार खेळाडूचा खराब फाॅर्म कायम
बीसीसीआयकडून दरमहा पैसे घेण्यामागे काय आहे सचिन आणि धोनी यांचे गुपित?
चार्टर्ड अकाउंटंट असून क्रिकेटमध्ये जीव., गोलंदाजासाठी श्रेयस अय्यरने केली खास कृती!
Comments are closed.