धनश्रीसोबतचे नाते तुटणार? चहलच्या शब्दांमागचं गूढ काय?
भारतीय संघाचा खेळाडू युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी धनश्री वर्मा सोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तसेच सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहेत. काही रिपोर्टनुसार त्यांच्या घटस्फोटावर शेवटची सुनवाई वांद्र्यातील फॅमिली कोर्टामध्ये झाली होती. त्यावेळी युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होते. धनश्री वर्माच्या वकिलांच म्हणणं आहे की, कारवाई अजून सुरू आहे. यादरम्यान युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामुळे चर्चा अधिकच वाढल्या आहेत.
युजवेंद्र चहलने स्वर्गीय अमेरिकी लेखिका मिशेल मैकनमारा यांचा एक सुविचार त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. त्यामध्ये अस लिहिल आहे की, इथे सगळ विस्कटलेल आहे त्यामुळे जरा आदराने वागा. या विचारातून आपण केवळ अंदाज लावू शकतो की चहल वैयक्तिक रित्या दुःखी आहे. धनश्री बद्दलच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान याआधीही चहलने एक पोस्ट शेअर केली होती.त्यामध्ये त्याने सांगितले होते की, देव कायम त्याच्या सोबत राहिला आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये धनश्री वर्मावर या कारणामुळेही टीका होत होत्या की, तिने 60 करोड रुपयांची पोटगी मागितली आहे. अशा चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. पण धनश्रीने आणि तिच्या परिवाराने या सगळ्या गोष्टींना खोटे ठरवले आहे. तसेच हा आग्रह केला आहे की कोणत्याही खोट्या माहितीवर चुकीचे गैरसमज पसरवू नका.
धनश्री वर्माकडून आदिती मोहन ही केस लढत आहे. त्यांनी पुढच्या कारवाई बद्दल सांगितले की, मी कारवाई बाबत आता कोणतीही उत्तरे देऊ इच्छित नाही. हा मामला सध्या न्यायालयात चालू आहे. तसेच सोशल मीडियावर कोणताही रिपोर्ट टाकण्याआधी तपासायला हवे . कारण चुकीच्या अफवा पसरत आहेत.
हेही वाचा
IND vs NZ: मोहम्मद शमीला मिळणार विश्रांती, या डावखुऱ्या गोलंदाजाची होणार एँट्री?
क्रिकेट मैदान जलमय! पाकिस्तानने पाणी हटवण्यासाठी केला हास्यास्पद प्रयत्न
जोस बटलरची जागा कोण घेणार? इंग्लंडच्या कर्णधारपदासाठी 3 प्रमुख दावेदार!
Comments are closed.