दक्षिण आफ्रिकेची विजयी झेप! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश
गट ‘ब’ मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ होते. दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 107 धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यानंतर आता तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडला 200 धावांत रोखले. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. मार्को जॅन्सनने 39 धावांत 3 बळी घेतले, तर वियान मुल्डरने 25 धावांत 3 फलंदाजांना बाद केले. केशव महाराजनेही दोन विकेट घेतल्या, तर कागिसो रबाडा आणि लुंगी न्गिडी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
आता उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना गट ‘अ’ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होणार आहे. उपांत्य फेरीतील हा सामना 5 मार्च 2025 रोजी लाहोर येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता सर्वांच्या नजरा उपांत्य फेरीतील त्यांच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.
🚨 दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला 🚨 pic.twitter.com/uttxezcdqi
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 1 मार्च, 2025
हेही वाचा-
SA vs ENG: इंग्लंडची दुर्दशा, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उडवला धुव्वा, 179 धावांत सर्वबाद
Champions Trophy: भारत विरूद्ध न्यूझीलंड कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकार्ड्स
IPL 2025: आरसीबीचे 11.50 कोटी पाण्यात? या स्टार खेळाडूचा खराब फाॅर्म कायम
Comments are closed.